आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील सुपर १२ फेरीतील सामन्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत रविवारी (२४ ऑक्टोबर) भारत विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु पाकिस्तान संघाने अप्रतिम कामगिरी करत भारतीय संघाला १० गडी राखून पराभूत केले. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडू गुडघ्यावर बसल्याचे पाहायला मिळाले होते, ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना जेव्हा रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची जोडी मैदानात आली होती. त्यावेळी केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी मैदानात तर संघातील इतर खेळाडूंनी डगआउटमध्ये गुडघ्यावर बसून ‘ब्लॅक लिव्ह मॅटर्स’ या जागतिक मोहीमेला पाठिंबा दिला. तसेच पाकिस्तान संघातील खेळाडूंनी आपल्या हृदयावर हात ठेऊन या मोहिमेत सहभागी झाले.
यापूर्वी देखील इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यात खेळाडूंनी गुडघ्यावर बसून या जागतिक मोहिमेला पाठिंबा दिला होता. भारतीय संघाने पहिल्यांदाच अशाप्रकारे समर्थन केले आहे. गतवर्षी मे महिन्यात अमेरिकेत पोलिस कर्मचाऱ्याच्या हातून आफ्रिकन अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाल्यापासून, जगभरातील खेळाडूंनी गुडघे टेकून वर्णद्वेषाविरुद्धच्या या आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आहे.
Team India bent knees to support the BLM (Black Lives Matter) movement.
Not going into the legitimacy/wokeness of the movement, what India has to do with it?
When does team India going to extend its support to Hindus who are getting persecuted in Bangladesh, by some gestures? pic.twitter.com/GSiofqAsjj
— Angraj (@angraj_) October 24, 2021
T20 WC: India take the knee to show solidarity with BLM movement#T20WorldCup2021 pic.twitter.com/xUhZEVlAAQ
— Ai News (@OfficialAiNews) October 24, 2021
तसेच भारत- पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, पाकिस्तान संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली होती. तर रिषभ पंतने ३९ आणि रवींद्र जडेजाने १३ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाला २० षटक अखेर ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवानने सर्वाधिक ७९ आणि बाबर आजमने ६८ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने १० गडी राखून विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
रिजवानने उत्कृष्ट फलंदाजी तर केलीच, पण ‘या’ गोष्टीने लाखो चाहत्यांची हृदयही जिंकली; व्हिडिओ व्हायरल
होय, हेच ते खलनायक! युवांबरोबर ‘हे’ ५ अनुभवी भारतीय खेळाडू पाकिस्तानपुढे गारद, पराभवास ठरले जबाबदार