भारतात २०२३चा ५० षटकांचा विश्वचषक आणि २०२१ची चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. याची अधिकृत घोषणा बीसीसीआयच्या सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली.
२०२३या वर्षी होणारा विश्वचषक हा १३वा ५० षटकांचा विश्वचषक आहे. फक्त भारत संपूर्ण विश्वचषकाचा यजमान बनण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. यापूर्वी १९८७, १९९६ आणि २०११ मध्ये भारत ५० षटकांच्या विश्वचषकाचा संयुक्त यजमान होता.
या विश्वचषकात १० संघ सहभागी होणार असून २०२२मध्ये विश्वचषक पात्रता फेरीतून दोन संघ विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे.
भारतीय संघ १९८३ आणि २०११ साली हा विश्वचषक जिंकला आहे.
विश्वचषकाच्या घोषणेबरोबरच २०१९ ते २०२३ या काळातील भारतीय संघ भारतात जे ८१ आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.