भारतीय संघ अफगाणिस्तान संघाबरोबर ऐतिहासिक कसोटी सामना खेळणार आहे. हा सामना भारतात होणार असल्याची अधिकृत माहिती बीसीसीआयचे प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली आहे.
सोमवारी बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत याबदल निर्णय घेण्यात आला आहे.
“अफगाणिस्तान आपला पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलिया संघाबरोबर २०१९मध्ये खेळणार होता. परंतु दोन्ही देशांचे घनिष्ट संबंध लक्षात घेऊन ही भारत या मालिकेचे यजमानपद भूषविणार आहे. “
यामालिकेची कोणतीही वेळ अजून घोषित झाली नाही.
India to play inaugural test against Afghanistan. welcome them to five-day cricket. @ACBofficials @BCCI
— Rahul Johri (@RJohri) December 11, 2017
जून २०१७मध्ये अफगाणिस्तान आणि आयर्लंड देशाला कसोटी संघाचा दर्जा मिळाला आहे. २००० सालानंतर कसोटी दर्जा मिळालेले हे दोन देश आहेत. २००० साली बांगलादेशला हा दर्जा मिळाला होता.
आयर्लंड संघ मे २०१८मध्ये पाकिस्तान संघाबरोबर आपला पहिला सामना खेळणार आहे.