कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जवळपास सहा महिन्यापेक्षा अधिक काळ भारतीय क्रिकेटचे सामने होऊ शकले नाही. सर्व क्रिकेट चाहते क्रिकेट सामन्यांची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आयपीएलला सुरुवात झाली आणि चाहत्यांना आनंद झाला. आता चाहत्यांसाठी अजून एक आनंदाची बातमी आहे. भारतीय संघ आयपीएलनंतर ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. या दौऱ्यावरील पहिला वनडे सामना 27 नोव्हेंबरला खेळला जाईल.
मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने खेळण्याआधी नियमित कसोटी सामना खेळणारे सदस्य आरक्षित खेळाडूंविरूद्ध सराव सामना खेळू शकतात. न्यू साउथ वेल्स सरकारने भारतीय संघाला दौर्यासाठी मान्यता दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियासाठीदेखील या दौऱ्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करत होते. आता केवळ बीसीसीआयच्या अंतिम होकाराची गरज आहे.
आधी खेळली जाईल वनडे मालिका
ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय संघ वनडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरेल. 27 आणि 29 नोव्हेंबरला सिडनी येथे पहिला आणि दुसरा वनडे सामना खेळला जाईल. यानंतर पुढील वनडे सामना 1 डिसेंबरला कॅनबेरा येथे होईल.
डिसेंबरमध्ये होईल टी20 सामना
पहिला टी20 सामना कॅनबेरा येथे 4 डिसेंबर रोजी खेळला जाईल. यानंतर दोन्ही संघ पुन्हा सिडनीमध्ये दाखल होतील. सिडनी येथे 6 आणि 8 नोव्हेंबरला दुसरा आणि तिसरा टी20 सामना खेळला जाईल.
वनडे आणि टी20 मालिका संपल्यानंतर सुरु होईल कसोटी मालिका
वनडे आणि टी20 मालिका संपल्यानंतर अॅडिलेड ओव्हल येथे 17 डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिला सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्याशिवाय कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अॅडिलेडचे मैदान बॉक्सिंग डे कसोटीचा (26 डिसेंबरपासून सुरु होणारा सामना) बॅकअप म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर होईल. आहे. यानंतर 7 ते 11 जानेवारी दरम्यान तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळला जाणार आहे. तर शेवटचा कसोटी सामना 15 जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे होईल.
दीड महिन्यापेक्षा अधिक काळ असेल दौरा
भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दीड महिन्याहून अधिक काळ घालवेल. आयपीएल संपल्यानंतर भारतीय संघ यूएई येथूनच ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेल्यानंतर कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. सर्व सामने जैव सुरक्षित वातावरणात होतील.
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया वेळापत्रक
वनडे मालिका-
१) पहिला सामना – २७ नोव्हेंबर
२) दुसरा सामना – २९ नोव्हेंबर
३) तिसरा सामना – ०१ डिसेंबर
टी-२० मालिका –
१) पहिला सामना टी-२० – ४ डिसेंबर
२) दुसरा सामना टी-२० – ६ डिसेंबर
३) तिसरा सामना टी-२० – ८ डिसेंबर
कसोटी मालिका –
१) पहिला सामना – १७ ते २१ डिसेंबर
२) दुसरा सामना – २६ ते ३१ डिसेंबर
३) तिसरा सामना – ७ ते ११ जानेवारी
४) चौथा सामना १५ ते १९ जानेवारी
महत्त्वाच्या बातम्या –
RRच्या गोलंदाजांवर SRHचे फलंदाज ठरले भारी; विजय मिळवत घेतली पाचव्या क्रमांकावर उडी
पांडेजी तुस्सी ग्रेट हो! RR विरूद्ध मनीष पांडेचा मोठा कारनामा; धोनीसारख्या दिग्गजांच्या यादीत समावेश
मुलाची संघात निवड न झाल्याने त्यांनी क्रिकेट पाहायचं सोडलं होतं; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला पितृशोक
ट्रेंडिंग लेख –
स्टेडियममध्ये प्रेक्षक नसतानाही सामना पाहाताना कोठून येतो त्यांचा आवाज? घ्या जाणून
नजर हटी, दुर्घटना घटी: दांडी उडवून गेलेल्या चेंडूला वाईड देणारे डॅरेल हार्पर
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज