भारताचा श्रीलंका दौरा आज (27 जुलै) पासून सुरु होत आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. तर श्रीलंका संघ चरिथ असलंकाच्या (Charith Asalanka) नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना आज (27 जुलै) खेळला जाणार आहे. तत्पूर्वी पहिल्याच टी20 सामन्यात श्रीलंकेनं टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील टी20 मालिका संपल्यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचं पारडं जड राहिलं आहे.
दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 29 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये भारतानं 19 जिंकले, तर श्रीलंकेला फक्त 9 सामने जिंकता आले. दोघांमधील एक सामना अनिर्णित राहिला. यापूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिका जानेवारी 2023 मध्ये खेळवण्यात आली होती. भारतानं ही मालिका 2-1 ने जिंकली होती.
पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत- शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रियान पराग, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, कुसल मेंडिस(यष्टीरक्षक), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चरित असलंका(कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महेश तीक्ष्णा, मथीशा पाथिराना, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका
महत्त्वाच्या बातम्या-
“फक्त इंजिन बदललंय, डब्बे तेच आहेत”, ‘लीडर’ रोहितचं कर्णधार सूर्यकुमारकडून लै कौतुक
“गंभीर भारतीय संघात फार काळ टिकणार नाही”, माजी भारतीय खेळाडूचा खळबळजनक दावा
कोरी अँडरसननं घेतला अविश्वसनीय झेल! VIDEO पाहून चाहते थक्क