मनात इच्छा, प्रबळ इरादे, ध्यास, मेहनत आणि प्रियजनांची साथ असेल तर यश फार काळ दूर राहू शकत नाही. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील बेरखेडी या छोट्याशा गावातील १९ वर्षीय वासू वत्स (Vasu Vats) या मुलाने हे सिद्ध केले आहे. पुढील वर्षी १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकासाठी वासूची भारतीय संघात (India U19 Cricket Team) निवड झाली आहे. (U19 Cricket World Cup West Indies 2022)
तब्बल सहा फूट दोन इंच उंच असलेला वासू हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. तो ताशी १३५-१४० किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो. भारताच्या वरिष्ठ संघासाठी एक दिवस विश्वचषक खेळण्याचे वासूचे स्वप्न आहे. त्याचसाठी एकोणीस वर्षाखालील विश्वचषक हे त्याचे व्यासपीठ आहे. वासू सकाळी सरावासाठी मैदानावर पोहोचायचा. त्याला ४० किमी जादा दुचाकी चालवावी लागू नये म्हणून तो दुपारी तासनतास मैदानावर बसून असायचा. त्यानंतर, संध्याकाळी सराव करून तो घरी पोहोचायचा.
प्रत्येक भारतीय मुलांप्रमाणेच वासूलाही लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती. मात्र, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी अकादमीत प्रवेश केला. एका मुलाखतीत बोलताना वासूने सांगितले की, त्याचे वडील एका खाजगी शाळेत प्राचार्य आणि आई सरकारी शाळेत शिक्षिका आहे. मात्र, त्याला अभ्यासात विशेष रस नव्हता. त्याच्या गावात क्रिकेटचे मैदान नव्हते. तो साधारण १५ वर्षांचा असताना गावापासून २० किमी अंतरावर असलेल्या गंगोह ब्लॉकमध्ये विनय यांच्या अकादमीत येऊ लागला होता.
तो सकाळी सात-आठच्या सुमारास बाईकने मैदानावर जात असे आणि संध्याकाळी सहा-सातच्या सुमारास परत येत. सकाळचे सत्र सकाळी १०-१२ वाजता संपलेले असायचे. मात्र, संध्याकाळी पुन्हा सराव सत्रात भाग घेण्यासाठी ४० किमी येणे-येणे त्याला परवडत नसे. पेट्रोल बचत करण्यासाठी तो दिवसभर तिथेच मैदानावर थांबायचा. त्यानंतर तो सराव करूनच संध्याकाळी सातच्या सुमारास घरी परतायचा. आई सकाळी जे काही जेवण बनवायची, ते सोबत घेऊन तो जायचा आणि दुपारी तेच खायचा. विश्वचषक संघात निवड झाल्याची बातमी वासूला मिळाली तेव्हा तो त्याच्या पालकांसोबत होता. वासू म्हणतो की, शिक्षक असूनही माझ्या पालकांनी माझ्यावर करिअर करण्यासाठी कधीही दबाव आणला नाही. मी त्याला सांगितले होते की, मला क्रिकेट खेळायचे आहे. यासाठी त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
कोणी टॉप तर कोणी फ्लॉप! दक्षिण आफ्रिकेत पदार्पण केलेले सात भारतीय कसोटीवीर (mahasports.in)
द्रविडच्या ‘या’ सल्ल्यामुळे मयंक करू शकला संघात पुनरागमन, स्वतः केला खुलासा (mahasports.in)
‘सूर्या’ पुन्हा एकदा तळपला! २४९ धावांच्या स्फोटक खेळीत पाडला षटकार-चौकारांचा पाऊस (mahasports.in)