वनडे विश्वचषक 2023 मध्ये रविवारी यजमान भारत आणि गुणतालिकेतील अव्वल संघ न्यूझीलंड हे आमने-सामने येणार आहेत. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. आतापर्यंत प्रत्येकी चार विजय मिळवून अजिंक्य असलेल्या या दोन्ही संघांमध्ये गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर जाण्यासाठी स्पर्धा असेल.
Captain Rohit Sharma getting ready for New Zealand challenge. pic.twitter.com/0P1CGwGUJR
— Johns. (@CricCrazyJohns) October 21, 2023
यजमान भारतीय संघाने या स्पर्धेत अपेक्षित कामगिरी करताना आपल्या चारही सामन्यात विजय मिळवले. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडने देखील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने सर्व संघांना पछाडत सलग चार विजय मिळवून चांगल्या धावगतीमुळे पहिले स्थान कमावले आहे.
आयसीसी स्पर्धांमधील मागील वीस वर्षांची कामगिरी पाहिल्यास भारतीय संघ न्यूझीलंडला पराभूत करण्यात अपयशी ठरला आहे. 2003 वनडे विश्वचषकात अखेरच्या वेळी भारताने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. मागील विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते.
या मैदानाच्या खेळपट्टीचा विचार केल्यास या खेळपट्टीवर सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना चांगली साथ मिळेल. मात्र, त्यानंतर फलंदाजांना पोषक अशीही खेळपट्टी बनेल. भारतीय संघाचा विचार केल्यास उपकर्णधार व अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी सूर्यकुमार यादव याला संधी मिळू शकते. तर, शार्दुल ठाकूर यांच्या जागी मोहम्मद शमी याला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, न्यूझीलंडसाठी नियमित कर्णधार केन विलियम्सन हा पुन्हा एकदा उपलब्ध नसेल.
संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
(India v Newzealand Match Preview 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
इतिहास घडला! आख्खा संघ 29 धावांवर All Out, एकाही फलंदाजाने केली नाही 10 Run करण्याची डेरिंग
खर्याला मरण नाही! विश्वचषक संघात संधी न मिळालेल्या सॅमसनची बॅट पुन्हा चमकली