भारतीय संघ आज दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आशिया कप 2022चा शेवटचा सामना अफगाणिस्तानशी खेळणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना आता केवळ औपचारिक सामना राहिला आहे. सुपर फोरमधील पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाल्याने भारतीय संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. असाच काहीसा प्रकार अफगाणिस्तानच्या बाबतीतही आहे. अफगाणिस्तान संघाला सुपर फोरच्या सामन्यात श्रीलंकेपाठोपाठ पाकिस्तानविरुद्धही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मात्र, आजचा सामना जिंकून मालिका दमदारपणे संपवण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. जिथे भारतीय चाहत्यांना आज कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून आणखी एका स्फोटक खेळीची अपेक्षा असेल. त्याचबरोबर अफगाणिस्तानचे चाहते हजरतुल्ला झाझाई, रहमानउल्ला गुरबाज आणि नजीबुल्ला जाद्रान यांच्या विशेष खेळीची वाट पाहत आहेत.
भारत विरुद्ध अफगाणिस्तान फॅन्टसी 11
कर्णधार – रोहित शर्मा
उपकर्णधार – हजरतुल्ला झाझई
यष्टिरक्षक- रहमानुल्ला गुरबाज
फलंदाज- विराट कोहली, सूर्यकुमार यादव, नजीबुल्ला जद्रान
अष्टपैलू – राशिद खान, हार्दिक पंड्या
गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान
भारताची संभाव्य प्लेइंग 11: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल,
अफगाणिस्तानचा संभाव्य प्लेइंग 11: हजरतुल्ला झाझाई, रहमानुल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, मोहम्मद नबी (कर्णधार), रशीद खान, अजमतुल्ला ओमरझाई, नवीन-उल-हक, मुजीब उर रहमान आणि फजल फारुकी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भर सामन्यात भांडणं करणं खेळाडूच्या अंगलट! आयसीसीने स्पर्धेतूनंच केलंय बॅन
ASIA CUP: शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचे हे खेळाडू भारतासाठी काळ ठरणार!
‘चाहरची संघात एन्ट्री- भुवीची हकालपट्टी!’ पाहा अफगाणिस्तान विरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग 11