आज बेंगलोर येथे होत असलेल्या एेतिहासिक कसोटी सामन्यात मैदानावर उतरताच अफगानिस्तान कसोटी क्रिकेट खेळणारा 12 देश बनला.
या एेतिहासिक सामन्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अफगानिस्तान क्रिकेट संघाला पत्र लिहून शुभेच्या दिल्या.
यामध्ये मोदी म्हणाले, ” अफगानिस्तानसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.या ऐतिहासिक कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने भारताशी सामना खेळायचे ठरवले याचा मला आनंद आहे.
प्रतिभाशाली युवा खेळाडूंचा भरना असलेल्या अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी खूप कमी वेळेत आपल्या कामगिरीची छाप सोडली आहे. त्यांनी अत्यंत कमी वेळेत साधलेली हि प्रगती वाखाणण्याजोगी आहे.
आम्हाला गर्व आहे की, बांगलादेश विरूद्धच्या टी-20 मालिकेत अफगाणिस्तानला ग्रेटर नोएडा आणि ढेहराडून येथे यजमान होण्याची संधी दिली. अफगानिस्तानच्या या प्रवासात भारत त्यांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करेल.
या एेतिहासिक सामन्यासाठी माझ्या दोनी संघांना शुभेच्छा. हा कसोटी सामना भारत-अफगाणिस्तान मधील मैत्रीत मैलाचा दगड ठरेल.”
हा एेतिहासिक सामना पहायला येण्यासाठी बीसीसीआयचे कार्यकारी संचालक अमिताभ चौधरी यांनी काबूल येथे जाऊन अफगानिस्ताचे राष्ट्रपती अशरफ घानी यांना निमंत्रण दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–टाॅप ५- कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंचपुर्वी शतकी खेळी करणारे खेळाडू
–न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटरने मोडला स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचा विक्रम
–टाॅप४- या संघांसोबत केले आहे सर्वाधिक संघांनी कसोटी पदार्पण