भुवनेश्वर । हॉकी वर्ल्ड लीग फायनल स्पर्धेमध्ये भारताचा आज उपांत्यफेरीचा सामना अर्जेंटीना संघाबरोबर होणार आहे. हा सामना जिंकला तर भारत अंतिम सामन्यात पोहोचेल.
या स्पर्धेतील साखळी सामन्यात भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली नव्हती. परंतु उपांत्यपूर्व फेरीत बेलजियम संघाला पराभूत करत भारताने स्पर्धेत पुनरागमन केले आहे.
भारताने स्पर्धेत बेलजियम विरुद्ध सर्वात खळबळजनक निकाल नोंदवला होता. या सामन्यात ३-३ अशी बरोबरी झाली असताना भारताने पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-२ अश्या फरकाने बेलजियम संघाला पराभूत करत उपनत्यफेरी गाठली होती.
अर्जेंटीना संघाने उपांत्यपूर्वफेरीत इंग्लड संघाला ३-२ अश्या फरकाने पराभूत करत उपांत्यफेरी गाठली आहे.
जागतिक क्रमांकावारीत अर्जेंटीना पहिल्या क्रमांकावर असून भारतीय संघ सहाव्या स्थानावर आहे. या दोन संघात आजपर्यंत ४६ सामने झाले असून २६वेळा भारतीय संघ १६वेळा अर्जेंटिना संघाने विजय मिळवला आहे. ४ सामने बरोबरीत सुटल्या आहेत.
हा सामना भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियम होणार असून संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.