चेन्नई । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या मालिकेतील पहिला वनडे सामना उद्या येथे सुरु होत. त्यामुळे सामन्याच्या पूर्वसंधेला भारतीय कर्णधार विविध माध्यमांना सामोरे गेला. यावेळी कर्णधार विराट कोहलीने अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली.
त्यामुळेच जेव्हा त्याला शतके करण्याच्या त्याच्या विक्रमांबद्दल विचारण्यात आले तेव्हा माझ्यासाठी वैयक्तिक विक्रमांपेक्षा संघाचं जिंकणं महत्त्वाचं असल्याचं विराटने अधोरेखित केले आहे.
विराट म्हणतो, ” मी तीन आकडी धावसंख्येसाठी खेळत नाही. त्यामुळेच मी हा आकडा पार करत असेल. मी ह्या आकड्याचा विचारही करत नाही. विक्रमांसाठी मला कोणत्याही दबावात खेळी करायच्या नाहीत. माझ्यासाठी संघाने जिंकणं जास्त महत्वाचं आहे. ”
” मी पूर्वीही म्हटलो आहे की जर संघ जिंकत असेल तर ९८ काय किंवा ९९ काय कोणत्याही धावसंख्येवर नाबाद राहिलो तर फरक पडत नाही. मी शेवटपर्यंत खेळण्याचा प्रयत्न करतो आणि समोरच्या संघाने जर चांगल्या धावा केल्या तर नक्कीच माझ्या धावा होतात आणि विक्रमही . ” असेही विराट पुढे म्हणाला.
यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर
विराट कोहलीने वनडे कारकिर्दीत १८६ डावात ५६च्या सरासरीने ८५८७ धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या ३० शतकांचा तर ४४ अर्धशतकांचा समावेश आहे.