भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान होणारी वनडे मालिका ही आयसीसीच्या जुन्याच नियंमानी खेळवली जाणार आहे. आयसीसीच्या नवीन क्रिकेट नियमांप्रमाणे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला १ ऑक्टोबर पासून सुरुवात होणार होती. परंतु या मालिकेला यातून सूट देण्यात आली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान ५ वनडे आणि ३ टी२० सामने खेळवले जाणार आहेत. ही मालिका १७ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. मालिकेचा शेवटचा दिवस १३ ऑक्टोबर आहे. यादरम्यान १ ऑक्टोबरपासून हे नियम आयसीसी आधी लागू करणार होती. परंतु एखाद्या मालिकेच्या मध्यातून हे नियम लागू करणं योग्य ठरलं नसत त्यामुळे या मालिकेत हे नियम लागू होणार नाही.
२८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिका-बांगलादेश मालिकाही सुरु होत आहे. तारखांचा होणार गोंधळ टाळण्यासाठी १ ऑक्टोबर ऐवजी २८ सप्टेंबरपासूनच हे नियम दक्षिण आफ्रिका-बांगलादेश मालिकेत हे नियम वापरले जाणार आहे. भारत-ऑस्टेलिया वनडे मालिकेतील एक सामना जरी २८ सप्टेंबर रोजी होणार असला तरी ही मालिका जुन्याच नियमांने होणार आहे.