भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुप्रतीक्षित वनडे मालिकेला शुक्रवारी ( 27 नोव्हेंबर ) सुरुवात झाली. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाला सुरुवातीच्या दोन सामन्यात सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली.
भारतीय संघात सहाव्या गोलंदाजाची कमतरता आहे, असे भाष्य याआधी अनेक दिग्गजांनी केले. यातच माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरने भारतीय संघाच्या खराब प्रदर्शनामुळे संघ निवडकर्त्यांवर ताशेरे ओढले आहे.
‘ही’ निवडकर्त्यांची चूक – गौतम गंभीर
ईएसपीएन क्रिकइन्फोशी संवाद साधताना गौतम गंभीर म्हणाला,”निवडकर्ते वॉशिंग्टन सुंदर किंवा शिवम दुबे या खेळाडूंना वनडे संघात स्थान देऊ शकले असते. जेणेकरून पुढील सामन्यात त्यापैकी एका खेळाडूचा प्लेयिंग इलेव्हनमध्ये समावेश होऊ शकला असता.परंतु यापैकी कुणीही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नाही. अशा परिस्थितीत ही निवडकर्त्यांची चुकी आहे.”
भारतीय संघावर पडेल प्रभाव
“कोणताही फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो, यावरून त्याची चाचणी करण्यात येते. त्याला खेळण्याची संधी न देता तुम्ही त्याच्याबद्दल काहीही ठरवू शकत नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघात अशा खेळाडूंना संधी देण्यात आली नाही. या निर्णयामुळे भारतीय संघावर फार मोठा प्रभाव पडेल,” असेही पुढे बोलताना गंभीर म्हणाला.
विराटने हार्दिकला गोलंदाजी देण्याचा घेतला निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या महत्वाच्या गोलंदाजांना गडी बाद करण्यात अपयश आल्यावर कर्णधार विराट कोहलीने अष्टपैलू हार्दिक पंड्याला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला.
हार्दिकने स्टीव्ह स्मिथला केले बाद
हार्दिकनेही कर्णधाराचा हा निर्णय सार्थकी ठरवला. त्याने शतकवीर स्टीव्ह स्मिथला बाद केले. त्याने 4 षटकांत 24 धावा देऊन एक गडी बाद केला.
सप्टेंबर 2019 नंतर हार्दिकने प्रथमच केली गोलंदाजी
सप्टेंबर 2019 नंतर हार्दिकने प्रथमच गोलंदाजी केली. दुखापतीमुळे तो गोलंदाजी करण्यास तंदुरुस्त नाही अशी चर्चा या सामन्याआधी रंगली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Video : लई भारी ! ऑस्ट्रेलियात घुमला छत्रपती शिवरायांचा जयघोष, तिरंग्यासोबत भगवाही झळकला