---Advertisement---

दुसऱ्या टी२० सामन्यासाठी असे असू शकतात भारत-ऑस्ट्रेलिया ११ जणांचे संघ

---Advertisement---

भारतीय संघाने तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत पहिला सामना जिंकून चांगली सुरुवात केली आहे. या मालिकेतील दुसरा सिडनी क्रिकेट मैदानात रविवारी(6 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ मालिका विजायाच्य इराद्याने मैदानात उतरेल, तर ऑस्ट्रेलिया मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.

मात्र या दोन्ही सामन्यापूर्वी दोन्ही संघांना मोठे धक्के बसले आहेत. पहिल्या वनडे सामन्यादरम्यान दुखपतग्रस्त झालेला रविंद्र जडेजा उर्वरित दोन सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार ऍरॉन फिंच सुद्धा दुखापतग्रस्त असल्याची माहिती मिळत आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने वैयक्तिक कारणाने उर्वरित टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.

त्यामुळे जडेजाऐवजी युजवेंद्र चहलला अंतिम 11 जणांच्या संघात जागा मिळू शकते. तर फिंच ऐवजी ऑस्ट्रेलियाकडून अंतिम 11 संघात मॅथ्यू वेड सलामीला फलंदाजी करु शकतो. तसेच मिशेल स्टार्कच्या जागेवर अँड्र्यू टायला संधी मिळू शकते.

दुसऱ्या टी20 सामन्यासाठी संभावित 11 जणांचे संघ –

भारतीय संघ – शिखर धवन, केएल राहुल (यष्टीरक्षक), विराट कोहली (कर्णधार), संजू सॅमसन, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चाहर, युझवेंद्र चहल, टी नटराजन आणि जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया संघ : ऍराॅन फिंच/मॅथ्यू वेड, डॉर्सी शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मोझेस हेन्रीक्स, ऍलक्स कॅरी, सीन एबॉट, अँड्र्यू टाय, नॉथन, लॉयन, ऍडम झम्पा, जोश हेझलवूड.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-ऑस्ट्रेलिया सराव सामना : शुभमन गिल-पृथ्वी शॉ शुन्यावर बाद, तर रहाणे आणि पुजारा….

ब्रेकिंग ! ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कची भारताविरुद्ध टी20 मालिकेतून माघार; ‘हे’ आहे कारण

‘जडेजाला ११ वर्षांनंतरही तितका सन्मान मिळत नाही’, माजी भारतीय खेळाडूने व्यक्त केली खंत

ट्रेंडिंग लेख –

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

‘बर्थडे बॉय’ रविंद्र जडेजाबद्दल या खास १० गोष्टी माहित आहेत का?

भारताच्या ‘या’ ५ दिग्गज क्रिकेटपटूंचा आज आहे वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---