भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांची बॉर्डर गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. यामधील तिसरा सामना सिडनीत गुरुवार पासून खेळला जात आहे. त्यानंतर होणार्या चौथ्या कसोटी सामन्याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. हा चौथा सामना ब्रिस्बेन येथे खेळला जाणार आहे. भारतीय खेळाडूंनी या ठिकाणी हा सामना खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे चौथ्या सामन्याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे.
काही दिवसापूर्वी बातमी आली होती की बीसीसीआयने चौथा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे आयोजित न करता दुसर्या ठिकाणी खेळला जावा असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले होते. परंतु आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे की, बीसीसीआयने अशा प्रकारची अधिकृतपणे कोणतीही मागणी केली नाही. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलिया चौथा सामना आयोजित करण्यास कटिबद्ध आहे.
त्याचबरोबर आता एका मीडियाचा रिपोर्ट समोर आला आहे. ज्यानुसार बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला अधिकृतपणे पत्र पाठवून स्पष्ट केले आहे की भारतीय संघ चौथा सामना खेळण्यासाठी ब्रिस्बेनसाठी रवाना होणार नाही. जर हा चौथा सामना आयोजित करायचा असेल, तर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दुसर्या ठिकाणाचा शोध घ्यायला हवा. अन्यथा ही मालिका सिडनीत संपुष्टात येईल.
भारतीय खेळाडू एक महिना राहिलेत क्वारंटाइन
सध्या असे म्हणले जात आहे की, बीसीसीआयने हे कडक शब्दाचे पत्र, क्वीन्सलँडच्या आरोग्य मंत्र्याच्या त्या प्रतिक्रियेनंतर पाठवण्यात आले आहे. ज्यामधे क्वीन्सलँडच्या आरोग्य मंत्री म्हणाले होते की, जर भारतीय संघाला नियमांचे पालन करायचे नसेल तर त्यांनी ऑस्ट्रेलियाचा दौरा करू नये.
बर्याच कालावधी पासून भारतीय संघातील खेळाडू जैव सुरक्षित वातावरणात राहत आहेत. बॉर्डर गावसकर मालिकेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंपैकी जास्त खेळाडू ऑस्ट्रेलिया दौर्यावर येण्यापूर्वी यूएईत झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होते. तिथे असताना भारतीय खेळाडू जवळपास 3 महिने जैव सुरक्षित वातावरण वास्तव्यास होते. त्यामुळे बीसीसीआयला वाटत नाही की, भारतीय संघाच्या खेळाडूंनी या आपल्या दौर्याचा शेवट हा पुन्हा एकदा क्वारंटाइन मध्ये करावा.
भारतीय खेळाडूंना चौथा सामना ब्रिस्बेन मध्ये खेळायचा नाही
एसईएनच्या माहितीनुसार बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या कठोर नियमांबद्दल अधिकृतपणे पत्र पाठवले आहे. ज्यामधे उल्लेख केला आहे की, भारतीय संघातील खेळाडूंनी खूप कालावधी पासून क्वारंटाइन मध्ये राहिल्याचे नमूद करताना सांगितले आहे की, जवळ- जवळ एक महिना आयसोलेशन मध्ये घालवला आहे.
एसईएनचे बातमीदार जिम्मी स्मिथने आपल्या बातमीत लिहले आहे की, बीसीसीआयने अधिकृतपणे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला पत्र पाठवले आहे. बीसीसीआय भारतीय खेळाडूंवर थोपवल्या जाणार्या कठोर नियमाच्या विरोधात आहे.
भारतीय खेळाडूंना हवे सामान्य लोकांप्रमाणे अधिकार
त्या बातमीत पुढे म्हणले आहे की ब्रिस्बेन मध्ये खेळाडूंवर कठोर नियम लावले आहेत. ज्यामुळे भारतीय संघाला ब्रिस्बेनचा दौरा करायचा नाही. कारण भारतीय संघातील खेळाडू सामान्य लोकांप्रमाणे फिरण्याचे अधिकार दिले जात नाही. कडक नियमांचा अवलंब न करता भारतीय खेळाडूंना सामान्य लोकांप्रमाणे अधिकार दिले तर चौथा सामना ब्रिस्बेन मध्ये होवू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
ज्या नवदीप सैनीने सिडनीत कसोटी पदार्पण केले, त्याच्यासाठी एकवेळ भांडला होता गंभीर
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”