भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात भारतीय संघ पराभूत होण्याला बर्याच गोष्टी कारणीभूत होत्या. त्यापैकी एक म्हणजे अजिंक्य रहाणेने विराट कोहलीला केलेले धावचीत. दुसऱ्या कसोटीपूर्वी रहाणेने ऑस्ट्रेलिया संघाने कितीही मानसिक खेळ केला, तरीही आपण मात्र आपल्या संघावर लक्ष केंद्रित करू असे म्हटले आहे.
भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे शुक्रवारी (२५ डिसेंबर) म्हणाला, बॉक्सिंग डे सुरू होण्यापूर्वी भलेही ऑस्ट्रेलिया संघ मानसिक खेळ, खेळत राहू. मात्र, त्याचा लक्ष आपल्या संघावर असणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर गुरुवारी म्हणाले, “भारतीय संघ दबावात असेल, तर आम्हाला आनंद होईल. त्याचबरोबर विराट कोहलीच्या अनुपस्थित संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेवर आम्ही अतिरिक्त दबाव टाकण्याचा प्रयत्न करू.”
ऑस्ट्रेलिया मानसिक खेळ खेळण्यात पटाईत
अजिंक्य रहाणे म्हणाला, “ऑस्ट्रेलिया संघ मानसिक खेळ खेळण्यात पटाईत आहे. त्यांना खेळू द्या, आम्ही आमच्या खेळावर लक्ष देऊ. आम्ही आमच्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करू.” पुढे बोलताना तो म्हणाला, “भारतीय संघाचे नेतृत्त्व करणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. ही चांगली संधी आहे आणि जबाबदारीसुद्धा. त्यामुळे मी कोणता दबाव घेणार नाही. माझे काम भारतीय संघाला साथ देण्याचे आहे. फोकस माझ्यावर नाही, संघावर आहे आणि आम्ही एक संघ म्हणून चांगले खेळण्याचे प्रयत्न करू. ”
विराट कोहलीने बिनधास्त खेळण्याचा सल्ला दिला
अजिंक्य रहाणेने खुलासा केला की, विराट कोहलीने मायदेशी परतण्यापूर्वी बिनधास्त क्रिकेट खेळायला सांगितले आहे. अजिंक्य म्हणाला,” विराट कोहलीने जाण्यापूर्वी आमच्या सोबत चर्चा केली. ऍडलेडमध्ये आमच्या संघाचा डिनर होता आणि त्याने आम्हाला एक- दुसर्यासाठी खेळण्यासाठी, एकमेकांना मिळालेल्या यशाचा आनंद घेणे, त्याचबरोबर मैदानावर एकमेकांना मदत करण्याचा सल्ला दिला.” अजिंक्य म्हणाला एक तास खराब प्रदर्शन केले म्हणून आमचा संघ खराब ठरत नाही. तो म्हणाला, “आम्ही दोन दिवस चांगली कामगिरी केली. मात्र, एक तासाच्या खराब कामगिरीमुळे पराभूत झालो.”
‘बॉक्सिंग डे’ सामन्यात खेळाडूंनी आपला स्वाभाविक खेळ खेळावा- अजिंक्य
शुबमन गिल दुसऱ्या सामन्यातून कसोटी पदार्पण करत आहे. अजिंक्य म्हणाला, “सलामी फलंदाजाची भूमिका मुख्य असते. मला त्यांच्यावर कोणताही दबाव द्यायचा नाही. त्यांना त्यांचा स्वाभाविक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य देणार आहे. सुरुवातीला भागीदारी झाली की मागून येणाऱ्या खेळाडूला सोपे होते. ”
महत्त्वाच्या बातम्या-
जस्टिन लॅंगरने टाकलेल्या माइंडगेमच्या गुगलीवर अजिंक्य रहाणेचा सिक्सर; म्हणाला…
सचिनपासून विराटपर्यंत अनेक दिग्गज खेळाडूंनी ‘अशा’ दिल्या ख्रिसमसच्या शुभेच्छा!
‘मला माझ्या फलंदाजी क्रमाबाबत लवचीकता ठेवायचीय’, ऑस्ट्रेलियन खेळाडूचे वक्तव्य