भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी केली. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 369 धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांनंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची पहिल्या डावात 6 बाद 186 अशी बिकट परिस्थिती झाली होती. मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर या दोघांनी दमदार भागीदारी केली. त्यामुळे भारतीय संघाने या सामन्यात पुनरागमन केले.
या सामन्यात आपले कसोटी पदार्पण करत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने शानदार प्रदर्शन केले. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघाचे 3 गडी बाद केले. त्याचबरोबर फलंदाजी करताना शार्दूल ठाकूर सोबत सातव्या गड्यासाठी 123 धावांची भागीदारी साकारली. त्यामुळे भारतीय संघाचे या सामन्यातील आवाहन जीवंत राहिले. त्याचबरोबर त्याने भारतीय संघाच्या 104 व्या षटकात एक सुरेख षटकार सुद्धा ठोकला. त्यामुळे सध्या त्याने ठोकलेल्या षटकारांची खूप चर्चा होत आहे.
That's spicy! A no-look six from Sundar 6️⃣
Live #AUSvIND: https://t.co/IzttOVtrUu pic.twitter.com/6JAdnEICnb
— cricket.com.au (@cricketcomau) January 17, 2021
वॉशिंग्टनने नॅथन लायनच्या गोलंदाजीवर ठोकला गगनचुंबी षटकार
आपला पहिलाच कसोटी सामना खेळत असलेल्या वॉशिंग्टन सुंदरने शानदार फलंदाजी केली. त्याने 144 चेंडूचा सामना करताना 7 चौकार आणि 1 षटकार ठोकत शानदार 62 धावांची अत्यंत उपयुक्त खेळी साकारली. त्याने आपल्या या खेळीत एक आकर्षक षटकारसुद्धा ठोकला. 104 व्या षटकात गोलंदाजीला आलेल्या नॅथन लायनच्या एका चेंडूवर त्याने एका पायावर बसून लॉग ऑनच्या दिशेने उत्तुंग असा शॉट खेळत गगनचुंबी षटकार खेचला.
षटकार मारल्यानंतर त्यांनी चेंडूकडे न बघता आपली नजर धावपट्टीवर ठेवली. त्याच्यामध्ये इतका आत्मविश्वास होती की, त्याने चेंडू सीमापार जातो की नाही हे सुद्धा पाहिली नाही. त्याच्या या षटकाराने समालोचन करत असलेल्या मोहम्मद कैफला युवराज सिंगची आठवण आली. त्यावर मोहम्मद कैफने सांगितले युवराज सिंग असे षटकार ठोकायचा. तसेच सध्या हार्दिक पंड्या सुद्धा असे षटकार खेचतो.
ठाकूर आणि सुंदर भारतीय संघाला पुनरागमन करून दिले
एक वेळ अशी होती, जेव्हा भारतीय संघाने पहिल्या डावात 186 धावा करताना 6 विकेट्स गमावले होते. तेव्हा धावपट्टीवर वॉशिंग्टन आणि ठाकूर होते. दोघे ही आपल्या कसोटी कारकिर्दीतील अनुक्रमे पहिला आणि दुसरा सामना खेळत होते. त्यामुळे कोणी कल्पनाही केली नव्हती की भारत 250 पेक्षा जास्त धावा करेल. मात्र या दोघांनी ही कल्पना कल्पनाच ठेवत वास्तवात भारतीय संघाला 300 धावांचा टप्पा करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. वॉशिंग्टन आणि ठाकूर या दोघांनी अनुक्रमे 62 आणि 67 धावांची खेळी करून भारतीय संघाचे पुनरागमन केले. त्याचबरोबर या सामन्यातील भारताचे आव्हान अबाधित ठेवले. या दोघांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात सर्वबाद 336 धावसंख्या उभारली.
महत्त्वाच्या बातम्या –
SL vs ENG : पहिल्या कसोटीत इंग्लंडचा विजय दृष्टीक्षेपात, केवळ ३६ धावांची गरज
आत्तापर्यंत केवळ ३ भारतीय जोड्यांनाच जमलेला ‘तो’ विक्रम आता शार्दुल-सुंदरच्याही नावावर