ऑस्ट्रेलियाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स शुक्रवारी म्हणाला की भारता विरुद्ध आगामी कसोटी मालिका थोडी आक्रमक होवू शकते. परंतु मर्यादित षटकांच्या मालिकेत दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये मित्रत्वाचे संबंध दिसून आली होते. चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 17 डिसेंबर पासून सुरुवात होईल.
कसोटी मालिका असेल आव्हानात्मक
पॅट कमिन्स एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत म्हणाला, “स्लेजिंगच्या बाबतीत हा दौरा मैत्रीपूर्ण राहिला. मैदानावर सर्व खेळाडू हसतमुखाने खेळताना दिसले. मात्र कसोटी सामन्याची गोष्ट वेगळी आहे, ज्यामधे पाच दिवस खेळावे लागते. यामध्ये इतकी मैत्री दिसणार नाही, कारण की ही मालिका नक्कीच खुप आव्हानात्मक होईल.”
पॅट कमिन्स म्हणाला, “मला विराट कोहलीला गोलंदाजी करण्याची प्रतीक्षा आहे. मला आनंद आहे की मला स्टीव्ह स्मिथला गोलंदाजी करावी लागणार नाही. मी मागील आठवड्यात केन विल्यम्सनचे द्विशतक पाहिले. आनंदी आहे की मी तिथे खेळत नव्हतो. बर्याचदा काही फलंदाजांसोबत प्रतिस्पर्धा मोठे होतात.”
कमिन्स म्हणाला, “माझ्या लक्षात आहे, जेव्हा ग्लेन मॅकेग्रा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराला गोलंदाजी करत होते. तुम्ही यासाठी बघत होता की तुम्हाला वाटत होते की काहीतरी तरी होणार आहे. त्यामुळे बघुया या मालिकेत काय होते.”
ऑस्ट्रेलिया संघाचा भावी कर्णधार मानला जात असलेला पॅट कमिन्स म्हणाला, “आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाज ही कर्णधार असू शकतात. मला वाटते की कसोटीत क्रिकेटमध्ये गोलंदाजाला संघाचे नेतृत्व करणे सगळ्यात सोपे आहे. तुम्ही त्यात खुप व्यस्त असता आणि गोलंदाजी मध्ये खूप प्रयत्न करतात. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त गोलंदाज संघाचे नेतृत्व करत नाहीत, याचे कारण मला माहित नाही.”
संबंधित बातम्या:
– ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी जिंकायची कसोटी मालिका? भारतीय दिग्गजांनी सांगितला प्लॅन
– कोहली नव्या भारतीय संघाचा प्रतीक, कसोटी सामन्याआधी ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने उधळली स्तुतीसुमने
– चाहत्यांसाठी खुशखबर! भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिसणार तब्बल इतके चाहते