कॅनबेरा। भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बुधवारी (२ डिसेंबर) तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने स्विच हिट (एकप्रकारचा शॉट) खेळला होता. त्यावर त्याला ६ धावा मिळाल्या होत्या. हा षटकार जवळपास १०० मीटर दूर लांबीचा होता. आता या शॉटवरून चांगलेच वातावरण तापले आहे. यावर ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल आणि माजी फिरकीपटू शेन वॉर्न यांनी प्रश्न उपस्थित केले. परंतु आयसीसीचे माजी पंच सायमन टॉफेल यांनी मॅक्सवेलची पाठराखण करत स्विच हिट नियमांविरुद्ध नसल्याचे म्हटले आहे.
‘नियमांविरुद्ध नाही स्विच हिट’
ऑस्ट्रेलियाच्या एका वृत्तपत्राशी बोलताना आयसीसीचे माजी पंच सायमन टॉफेल यांनी मॅक्सवेलची पाठराखण करताना म्हटले, “क्रिकेट हा खेळ काही विज्ञान नाही, ही एक कला आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की, अशा शॉटवर बंदी घातली पाहिजे, तेव्हा पंच कसे काय ठरवू शकतो की हे चुकीचे आहे. हे अशक्य आहे. पंचांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. जसे की फ्रंट फूट, बॅक फूट. कोणताही फलंदाज आपली ग्रिप बदलत आहे याकडे लक्ष देणे पंचांना शक्य नाही. आम्ही असे नियम बनवू शकत नाही, ज्याचा वापरच केला जाऊ शकत नाही.”
स्विच हिटवर प्रश्न उपस्थित
स्विच हिटदरम्यान जसा चेंडू गोलंदाजाच्या हातातून सुटतो, त्याचवेळी उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज आपली बॅट डाव्या हाताने पकडतो. बुधवारी जेव्हा असे मॅक्सवेलने केले, त्यावेळी चॅपेल यांनी यावर टीका केली. त्यांनी वाईल्ड वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सवर समालोचन करताना स्विच हिटवर बंदी घालण्याची मागणी केली.
त्यांनी म्हटले की, गोलंदाजाच्या हातातून चेंडू सुटताच जर कोणताही फलंदाज आपला हात किंवा पाय बदलतो, तेव्हा हा बेकायदेशीर शॉट आहे. शेन वॉर्ननेही या शॉटवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘स्विच हिटवर बंदी आणा’, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधाराची आयसीसीकडे संतप्त मागणी
१५ वर्षांच्या टी२० क्रिकेट इतिहासात कोणालाही न करता आलेला पराक्रम डेविड मलानने केलाय
…म्हणून मिशेल स्टार्क भारताविरुद्ध तिसऱ्या वनडेत खेळला नाही, फिंचने केला खुलासा
ट्रेंडिंग लेख-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे ५ संघ; टीम इंडिया आहे ‘या’ स्थानावर
भारताकडून २०२० मध्ये सर्वाधिक बळी घेणारे ५ गोलंदाज; ‘हा’ स्टार खेळाडू चक्क चौथ्या स्थानावर
‘हीच’ ती ३ तीन कारणे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला तिसर्या वनडेत भारताकडून पत्करावा लागला पराभव