भारताचा 19 वर्षीय युुवा फलंदाज पृथ्वी शॉला 30 नोव्हेंबरला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला अॅडलेड कसोटीला मुकावे लागले होते.
पण आता तो दुखापतीतून बऱ्यापैकी सावरल्याची चिन्हे दिसत आहेत. तो सोमवारी अॅडलेड कसोटीच्या शेवटच्या दिवशी मैदानावर डाव्या घोट्याला संरक्षणात्मक ब्रास लावून धावत होता.
तसेच या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (8 डिसेंबर) भारताचा दुसरा डाव सुरु होण्याआधी शॉने फिटनेस टेस्ट दिली होती.
त्यामुळे तो 14 डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या पर्थमधील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी त्याची ही प्रगती चाहत्यांना दिलासा देणारी आहे.
पण अजूनही संघ व्यवस्थापकांनी शॉ पर्थमध्ये पुनरागमन करेल की नाही याविषयी कोणतीही खात्री दिलेली नाही. पर्थ कसोटी जशी जवळ येईल तसे व्यवस्थापन निर्णय घेईल, असे भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मागील आठवड्यात सांगितले होते.
https://twitter.com/somsirsa/status/1071977651118792704
शॉ आॅस्ट्रेलिया एकादश विरुद्ध भारत संघात पार पडलेल्या सराव सामन्यात शुक्रवारी(30 नोव्हेंबर) दुखापतग्रस्त झाला होता.
या सामन्यात त्याला क्षेत्ररक्षण करताना बाउंड्री लाइनच्या जवळ मिड-विकेटला असताना झेल घेण्याच्या प्रयत्नात डाव्या पायाच्या घोट्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला लगेचच दवाखान्यात नेण्यात आले होते. त्याला मैदानातूनही भारतीय संघाच्या मेडिकल टीमने अक्षरश: उचलुन ड्रेसिंगरुममध्ये नेले होते.
त्याने आॅक्टोबरमध्ये विंडीज विरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने शतकी खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या:
–चार तासात विराट-अनुष्काच्या त्या फोटोला मिळाल्या तब्बल 22 लाखांपेक्षाही अधिक लाईक्स
–भारतीय महिला क्रिकेट संघाबद्दल ही आहे सर्वात मोठी बातमी
–अॅडलेड कसोटी विजयामुळे टीम इंडियाच्या बाबतीत घडला हा खास योगायोग