भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना रविवारी (29 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली. या कारणामुळेच त्याला मैदानाबाहेर जावं लागलं. त्याला मांडीच्या स्नायूंची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो उर्वरित मर्यादीत षटकांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे.
डेविड वॉर्नरच्या अनुपस्थितीमुळे भारतीय संघाला फायदा होईल असा विश्वास भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलला आहे.
वॉर्नर दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास संघाला होईल फायदा
भारतीय संघाचा उपकर्णधार केएल राहुल वॉर्नरच्या दुखापतीबद्दल बोलताना म्हणाला की, “त्याची दुखापत किती गंभीर आहे हे आम्हाला ठाऊक नाही. तो दीर्घकाळ दुखापतग्रस्त राहिल्यास आमच्या संघाला फायदा होईल. एखाद्या खेळाडूबद्दल असं विधान करणं योग्य नाही. परंतु तो ऑस्ट्रेलियाचा मुख्य फलंदाज आहे त्यामुळे जर त्याची दुखापत बराच काळ टिकेल, तर ही भारतीय संघासाठी चांगली बाब आहे.”
सलग दोन सामन्यात वॉर्नरने ठोकले अर्धशतक
वॉर्नरने भारताविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यात सलग दोन अर्धशतके झळकावली. एवढेच नव्हे, तर दोन्ही वनडे सामन्यात कर्णधार ऍरॉन फिंचसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारीही रचली.
वॉर्नरला जावं लागलं रुग्णालयात
भारताच्या डावाच्या चौथ्या षटकात वार्नरला दुखापत झाली. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात जावं लागलं.
ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या गाठण्यास केली मदत
दुसऱ्या वनडे सामन्यात वॉर्नरने 77 चेंडूंत 83 धावांची शानदार खेळी केली आणि संघाला 389 धावांचे विशाल धावसंख्या गाठून देण्यात मोलाची कामगिरी निभावली.
ऑस्ट्रेलियाने मालिकेत घेतली आघाडी
भारतीय संघाचा दुसऱ्या वनडे सामन्यात 51 धावांनी पराभव झाला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेतली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना बुधवारी (2 डिसेंबर) कॅनबेरा येथे खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –