ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 622 धावा करत डाव घोषित केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरादाखल तिसऱ्या दिवसाखेर पहिल्या डावात 6 विकेट्स गमावत 236 धावा केल्या आहेत.
या सामन्यात भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 3 विकेट्स मिळवल्या आहेत. यावेळी त्याने उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन या तिघांना बाद केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नच्या सल्ल्याचा कुलदिपला या तीन विकेट्स घेताना फायदा झाला आहे. अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटी दरम्यान त्याने वॉर्नला अनेक प्रश्ने विचारली होती.
यामध्ये वॉर्नने कुलदीपला त्याची सध्याची गोलंदाजीची शैली आहे तशीच कायम ठेवायला सांगितले होते. वॉर्न हा नेहमीच कुलदीपच्या गोलंदाजीचे कौतुक करत आला आहे.
या दोघांमध्ये झालेल्या चर्चेबाबत माजी भारतीय फिरकीपटू मुरली कार्तिकने या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर सोनी चॅनलवर सांगितले.
आजच्या (5 जानेवारी) सत्रात कुलदिपच्या अशाच एका ऑफ स्टम्पवर टाकलेल्या चेंडूवर पेन हा चांगला शॉट मारण्याच्या प्रयत्नात असताना यष्टीचीत झाला.
कुलदिपच्या गोलंदाजीचा सामना करण्यास ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अवघड जात होते, असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनेही समालोचन करताना म्हटले आहे.
https://twitter.com/SPNSportsIndia/status/1081425596213878785
महत्त्वाच्या बातम्या-
–१९ तासांत ४ लाख लाईक्स मिळालेला पंतचा तो फोटो पाहिला का?
–भारतीय फलंदाजांपेक्षा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केली जादा शतकं
–रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…