सिडनी। रविवारी (25 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा आणि शेवटचा टी20 सामना होणार आहे. या सामन्यासाठी आॅस्ट्रेलियाच्या 13 सदस्ययी संघात वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचा समावेश करण्यात आला आहे. त्याला दुखापतग्रस्त बिली स्टेनलेक ऐवजी आॅस्ट्रेलिया संघात संधी देण्यात आली आहे.
स्टेनलेकला शुक्रवारी मेलबर्नला झालेल्या दुसऱ्या टी20 सामन्याआधी सराव करताना घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याला संघाच्या बाहेर जावे लागले आहे.
त्याच्या ऐवजी संघात संधी मिळालेल्या मिचेल स्टार्क 2 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने शेवटचा टी20 सामना 2016 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.
स्टार्कच्या समावेशाबद्दल आॅस्ट्रेलियाचा कर्णधार एॅरॉन फिंच म्हणाला, “त्याला मर्यादीत षटकांचा चांगला अनुभव आहे. तो जेव्हा चेंडू योग्य पडतो तेव्हा गोलंदाज म्हणून किती प्रभावी आहे हे आपण पाहिले आहे.”
“आम्ही दुपारी खेळपट्टी कशी आहे हे पाहू आणि मग चर्चा करु. पण तो शिल्ड स्पर्धेतून पहिल्या कसोटीच्या दृष्टीने थेट येत आहे. त्याची तयारी खूप चांगली झाली आहे.”
स्टार्कने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 22 सामन्यात 18.86 च्या सरासरीने 30 विकेट्स घेतल्या आहेत.
आॅस्ट्रेलियाकडे स्टार्कसह नॅथन कुल्टर नाईल, मार्कस स्टॉयनीस आणि जेसन बेऱ्हेंडॉर्फ हे वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत.
हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असणार आहे. आॅस्ट्रेलिया 3 सामन्यांच्या या टी20 मालिकेत 1-0 अशी अघाडीवर आहे. आॅस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारतावर डकवर्थ लूईस नियमानुसार 4 धावांनी विजय मिळवला आहे.
तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे आता तिसरा सामना भारतासाठी निर्णायक ठरणार आहे.
या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेनंतर 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे.
असा आहे तिसऱ्या टी20 साठी आॅस्ट्रेलियाचा संघ- एॅरॉन फिंच (कर्णधार), अॅलेक्स कॅरे, अॅश्टन अॅगर, जेसन बेऱ्हेंडॉर्फ, नॅथन कुल्टर-नाईल, ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल, बेन मॅक्डरमॉट, डॉर्सी शॉर्ट, मार्कस स्टॉयनीस, अँड्र्यू टाय, अॅडम झम्पा, मिशेल स्टार्क
महत्त्वाच्या बातम्या:
–या ११ खेळाडूंना मिळणार शेवटच्या टी२० सामन्यात संधी
–क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीतून ७ जणांचा खून
–ब्रावोने शब्द पाळला, आपली बॅट दिली त्या खास व्यक्तीला