भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात बॉर्डर गावसकर मालिकेतील दुसरा कसोटी सामना मेलबर्न येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व आणि आपल्या खेळीने अजिंक्य रहाणेने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यानी संघाची धुरा सांभाळताना शतकी खेळी केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पाँटिंगने अजिंक्य रहाणेची प्रशंसा केली.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर रिकी पाँटिंग रहाणेची प्रशंसा करताना म्हणाला ऍडलेडमध्ये झालेल्या लाजिरवाण्या पराभवातून अजिंक्य रहाणेने भारतीय संघाचे नेतृत्व शानदारपणे निभावले आहे.
त्याने आपल्या नेतृत्वगुणाची छाप सोडताना ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्या डावात 195 धावांवर रोखले. त्याचबरोबर त्याने दुसर्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 104 धावांची खेळी करताना जडेजा सोबत 6 व्या गड्यासाठी नाबाद 104 धावांची भागीदारी केली. जडेजाने त्याला सुरेख साथ देताना नाबाद 40 धावांची खेळी साकारली. त्यामुळे भारतीय संघाने 82 धावांची आघाडी घेतली.
रिकी पाँटिंग क्रिकेट.डॉट.कॉम सोबत बोलताना म्हणाला, “ऍडलेडमध्ये झालेल्या पराभवानंतर त्याने पुन्हा एकदा संघाला सांभाळण्याच्या बाबतीत शानदार कामगिरी केली आहे. त्याने क्षेत्ररक्षणावेळी चांगले नेतृत्व केले, त्याचबरोबर जबाबदार कर्णधाराप्रमाणे फलंदाजी करत आहे. तो कर्णधारपदाला साजेशी खेळी करतोय. तो नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित शतक ठोकून आपले सर्वोत्तम योगदान देत आहे. ज्यामुळे त्यांचा देश मालिकेत पुनरागमन करू शकेल.”
अजिंक्यने आपल्या खेळीत शानदार 12 चौकार लगावले. रिकी पाँटिंगने त्याच्या संरक्षणात्मक खेळीची प्रशंसा केली. पॉटिंग म्हणाला,” त्याने चेतेश्वर पुजारा सारखी खेळी केली. तो कोणता धोका पत्करून खेळत नाही. कमी चौकार लगावून त्याने बचावात्मक खेळीवर विश्वास ठेवताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचे मनोबल कमी केले.”
अजिंक्यने आपल्या नेतृत्त्वाने प्रभावित केले परंतु पॉटिंग म्हणाला, विराट रजेवरून आल्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. पॉटिंग म्हणाला,” कोहली जोपर्यंत वाटेल तोपर्यंत नेतृत्व करेल, मात्र जर त्याने नेतृत्व सोडून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले तर विश्व क्रिकेटसाठी हे खूप भितीदायक ठरेल.”
46 वर्षीय पॉटिंग म्हणाला, “मी विराट कोहलीच्या नेतृत्व कौशल्यावर प्रश्न उपस्थित करत नाही, मात्र मी हे म्हणण्याचा प्रयत्न करत आहे की, अशा प्रकारे नेतृत्व करण्यासाठी तुमच्यामध्ये काहीतरी खास असावे, जसे की अजिंक्य रहाणेने आतापर्यंत केले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
पावसाने केली मैदानातील कर्मचाऱ्यांची दमछाक; मजेशीर व्हिडिओ झाला व्हायरल
ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं! ‘हा’ मोठा खेळा़डू तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता
‘या’ खेळाडूला धावताना झाली होती दुखापत, आता झाला दोन आठवड्यांसाठी क्रिकेटपासून दूर