---Advertisement---

INDvsAUS सामन्याच्या तिकीटाची किंमत केवळ 300 रुपये! ‘या’ दिवशी होणार विक्रीला सुरुवात

On: बुधवार, सप्टेंबर 7, 2022 3:29 PM
Aaron-Finch-Rohit-Sharma
---Advertisement---

चंदीगडला लागून असलेल्या पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील आयएस बिंद्रा क्रिकेट स्टेडियमवर 20 सप्टेंबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी20 सामन्याची तयारी जोरात सुरू आहे. बुधवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोहाली सामन्याच्या तयारीचा आढावा घेतला. भगवंत मान यांच्यासोबत राघव चढ्ढा, हरभजन सिंग आणि पीसीएचे अध्यक्ष गुलजार चहलही उपस्थित होते. मान यांनी सामन्यासाठी सर्व सुरक्षा व्यवस्था करण्यास सांगितले आहे. यावेळी मोहाली आणि चंदीगडचे पोलीस अधिकारीही उपस्थित होते.

त्याचवेळी क्रिकेटप्रेमी मोहाली सामन्याच्या तिकीट विक्रीची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. 11 सप्टेंबरपासून सामन्याची तिकीट विक्री सुरू होणार असल्याचे पीसीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांना सामन्याचे तिकीट 300 रुपयांना मिळणार आहे. पीसीएचे अध्यक्ष गुलझारिंदर सिंग चहल यांनी सांगितले की, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेचे ओळखपत्र घेऊन तिकीट काउंटरवर यावे लागेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चाहत्याने अर्शदीप सिंगला तोंडावरच म्हटले ‘गद्दार’! क्रिकेटरला आला राग अन्…

धक्कादायक! आयपीएल खेळलेल्या क्रिकेटपटूवर बला’त्काराचा आरोप, 17 वर्षीय मुलीने दाखल केली तक्रार
हार्दिक, रिषभमध्ये फलंदाजी क्रमावरून कंफ्यूजन, शेवटी पंतचा पडला चेहरा; पाहा काय झाले?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---