भारतीय संघाला ऍडलेडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता भारतीय संघाला शनिवारी (26 डिसेंबर) दुसरा सामना मेलबर्न येथे येथे खेळायचा आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थित भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. या सामन्याआधी भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर भारतीय संघाला एक सल्ला दिला आहे.
गंभीरचे म्हणणे आहे की, भारतीय संघाने पराभवाला मागे सोडून पुढील सामन्याकडे बघायला पाहिजे.
गौतम गंभीर म्हणाला, “भारतीय संघ ऍडलेडमध्ये झालेल्या पराभवामुळे नक्कीच दु:खी असेल. परंतु त्यांनी हे विसरायला नको की पहिल्या कसोटीतील पहिल्या दोन दिवस त्यांचा दबदबा होता”.
भारताने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 53 धावांची आघाडी घेतली होती. मात्र ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या डावात भारताला 36 धावांवर गुंडाळले. त्याचबरोबर या सामन्यात 8 विकेट्सने विजय प्राप्त केला. तसेच चार सामन्याच्या बॉर्डर गावसकर मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली.
स्टार स्पोर्ट्सच्या ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “भारतीय संघाने लक्षात ठेवायला पाहीजे की, पहिल्या दोन दिवसात भारतीय संघाचे वर्चस्व होते. पहिल्या दोन दिवस सामन्यात भारतीय संघाची पकड होती. एका सत्राला घेऊन दुःखी असतील, मात्र त्यांना लक्षात ठेवावे लागेल की अजून तीन सामने खेळले जायचे आहेत आणि त्यांच्याकडे त्यांचा सर्वश्रेष्ठ खेळाडू आणि कर्णधार विराट कोहली नाही आहे.”
गंभीर म्हणाला,” अजिंक्य रहाणेवर खूप जबाबदारी असणार आहे. मोहम्मद शम्मी ही संघात नाही आणि त्यामुळे संघाचे नियोजन कसे राहील बघावे लागेल. ”
यापूर्वी गौतम गंभीर म्हणाला होता की भारतीय संघाने चार गोलंदाजांसोबत उतरायला हवे आणि अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला पाहिजे. त्याचबरोबर गौतम गंभीर म्हणाला होता भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हन मध्ये केएल राहुल, रिषभ पंत आणि शुबमन गिल यांचा समावेश करावा.
मोहम्मद शमीला दुखापत
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसर्या डावात भारतीय संघाने 36 धावांवर 9 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र मोहमद शमीला फलंदाजी करताना दुखापत झाली होती. त्यामुळे तो उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘आम्ही कृष्णवर्णीय लोकांविषयी…’, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंचा खळबळजनक खुलासा
पुजारा सांभाळून खेळ! ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ गोलंदाज आखतोय खास प्लॅन
भारतीय संघात कोण घेऊ शकतो शमीची जागा, स्मिथने सांगितले नाव
ट्रेंडिंग लेख –
गुडबाय २०२०: या’ पाच क्रीडासुंदरींनी घेतली यावर्षी निवृत्ती; एक होती जगातील सर्वात सुंदर क्रीडापटू
स्लेजिंग करणार्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय खेळाडूंनी केलेल्या ३ जबरदस्त खेळ्या
यावर्षी फक्त तुमचीच हवा! आंतराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ३ गोलंदाज