भारताला श्रीलंका दौऱ्यात मिळालेल्या निर्भेळ यशानंतर, आता ऑस्ट्रलियाचा भारत दौरा १७ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलिया ५ वनडे सामने आणि ३ टी-२० सामने खेळणार आहे.
२००९ पासून ऑस्ट्रेलियाने भारत एकही वनडे मालिका जिंकलेली नाही. बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रलियाने १ सामना जिंकला आहे तर एक हरला आहे. त्याच बरोबर मिशेल स्टार्क, जॉश हेझलवूड आणि ऍरोन फिंच यासारख्या अनुभवी खेळाडूंची कमी ही संघाला जाणवणार आहे.
तर दुसऱ्या बाजूला भारताचे दोन दिगज्ज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना ही मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे तर शिखर धवनला ३ सामन्यांसाठी सुट्टी देण्यात आली आहे.
पाहुयात काय असेल पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताचा संभाव्य संघ.
सलामीवीर ( रोहित शर्मा आणि के एल राहुल )
भारताची सलामीची जोडी आता तरी अफलातून फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहित शर्माने मागील चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये २ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. त्यामुळे त्याची सलामीची जागा तर नक्कीच निश्चित आहे. पण त्याचा जोडीदार शिखर धवन पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे, त्यामुळे भारता पुढे मोठा प्रश्न असा आहे की त्याच्या जागे संधी कोणाला द्यायची.राहुलला सलामीला फलंदाजी करण्याच्याची जास्त संधी मिळाली नाही त्यामुळे त्याला संधी मिळू शकते. त्याच बरोबर पर्याय म्हणून अजिंक्य रहाणे सलामीला येऊ शकतो आणि तो ही फॉर्ममध्ये आहे. त्याने वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने ३ अर्धशतके तर १ शतक लगावले होते. पण त्याला श्रीलंका दौऱ्यात म्हणावी तशी संधी मिळाली नाही.
मधली फळी (विराट कोहली, मनीष पांडे, महेंद्रसिंग धोनी)
विराटचा सध्याचा फॉर्म बघता तो किमान भारतासाठी अजून ५ वर्ष तरी नंबर ३ राहील असे दिसून येते. विराटने २००८ मध्ये याच श्रीलंकेतील दौऱ्यात आपले पदार्पण केले होते, आता त्या गोष्टीला ९ वर्ष झाले आहेत. तेव्हा एक युवा खेळाडू म्हणून श्रीलंकेत गेलेल्या विराट कोहली आता भारताचा सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधार म्हणून श्रीलंकेत गेला आहे. श्रीलंका संघ विराटला थोडा जास्तच आवडतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो ५व्या क्रमांकावर आहे.
लोकेश राहुल या युवा खेळाडूने आतापर्यंत १४ एकदिवसीय सामने खेळे आहे ज्यात त्याने १ शतक आणि २ अर्धशकत लगावले आहे. २०१५ मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध त्याने आपल्या पाहिल्या सामन्या खेळाला होता. त्यानंतर त्याला एकदिवसीय सामन्यात जास्त संधी देण्यात आली नव्हती.
भारताचा दिग्गज फलंदाज आणि मागील एक वर्षांपासून फिनिशरचा रोल सोडून मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीकडून भारताला अपेक्षा असतील. मागील काही सामन्यात धोनी जरी फॉर्ममध्ये दिसला नसला तरी धोनी अजूनही एकहाती सामना फिरवू शकतो हे सर्वांना माहित आहे. श्रीलंके विरुद्धच्या दौऱ्यात तो एकदाही बाद झाला नव्हता.
अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पंड्या आणि केदार जाधव)
विराट कोहली जेव्हा पासून कर्णधार झाला आहे तेव्हापासून या दोन खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पंड्या गोलंदाजीमध्ये प्रत्येक सामन्यात एक दोन विकेट्स मिळवतो व फलंदाजीमध्ये आल्याबरोबर मोठे फटके मारून धावगती वाढवतो. तर केदार ही त्याच्या सारखाच फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगले योगदान देत आहे. केदारची इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातील शतकी खेळी अजून क्रिकेटप्रेमींच्या आठवणीत आहे. केदारची कामगिरी श्रीलंकेत एवढी काही खास नव्हती पण तरी सुद्धा कर्णधार कोहलीला त्याच्यावर विश्वास आहे.
फिरकी गोलंदाज (कुलदीप यादव आणि युझर्वेंद्र चहल)
सध्या जगातील सर्वात चांगले फिरकी गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन हे ते दोन प्रतिभावान खेळाडू. यांना या ही मालिकेत विश्रांती देऊन अक्सर पटेल, युझर्वेंद्र चहल आणि कुलदीप यादव या नव्या दमाच्या गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. जडेजा आणि अश्विन हे गेल्या काही एकदिवसीय मालिकेत मोठ्या प्रमाणावर चमक दाखवू शकले नसल्या कारणाने २०१९च्या विश्वचषकाला आपला विचार व्हावा असे जर सध्या स्थान दिलेल्या खेळाडूंना वाटत असेल तर त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल.
वेगवान गोलंदाज (जसप्रीत बुमराह आणि महंमद शमी )
यॉर्कर स्पेशालिस्ट म्हणून भारतभर प्रसिद्ध झालेल्या जसप्रीत बुमरा आणि दुखापतीतून संघात पुनरागमन करत असलेल्या महंमद शमीवर संघाच्या वेगवान गोलंदाजीची भिस्त असेल. संघात आणखीन २ वेगवान गोलंदाज आहेत ते म्हणजे भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव. उमेशला कसोटी प्रमाणे वनडे मध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही तर भुवनेश्वरला जास्त संधीच मिळाली नाही.