चेन्नई । भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही मर्यादित षटकांची मालिका येत्या १७ सप्टेंबरपासून चेन्नई वनडे सामन्याने सुरु होणार आहे. या सामन्यासाठी तिकिटांचे दर हे १२०० रुपयांपासून सुरु होणार आहे.
१० सप्टेंबरपासून पहिल्या सामन्यासाठी तिकीटविक्री सुरु होणार असून यात १२००, २४००, ४८०० आणि ८००० रुपयांची तिकिटे असल्याची घोषणा तामिळनाडू क्रिकेट असोशिएशनने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली.
पाहुण्यांसाठीच्या खास बॉक्सचे तिकीट हे १२ हजार रुपये तर पॅव्हिलियन टेरेसचे तिकीट ८००० रुपये असणार आहे. प्रसिद्धी पत्रकात सांगितल्याप्रमाणे चाहते www.bookmyshow.com वेबसाइटवरूनही तिकीट खरेदी करू शकतात.
यापूर्वी चेन्नई येथे झालेल्या वनडे सामन्यात तिकीटदर हे ७५० रुपये होते परंतु goods and services tax (GST) जीएसटी आणि महानगरपालिका मनोरंजन करामुळे हे दर १२०० झाल्याचे मंडळाकडून कळवण्यात आले आहे.
पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ १२ सप्टेंबर रोजी अध्यक्षीय संघाबरोबर पहिला सराव सामना चेन्नई येथे खेळणार आहे. यात तामिळनाडूचे वॉशिंग्टन सुंदर आणि राहील शाह हे खेळाडू खेळणार आहेत तर हेमांगी बदानी हे प्रशिक्षक असतील.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
१२ सप्टेंबर । सराव सामना । चेन्नई
१७ सप्टेंबर । पहिली वनडे । चेन्नई
२१ सप्टेंबर । दुसरी वनडे । कोलकाता
२४ सप्टेंबर । तिसरी वनडे । इंदोर
२८ सप्टेंबर । चौथी वनडे । बेंगळुरू
१ ऑक्टोबर। पाचवी वनडे । नागपूर
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी२० मालिकेचे वेळापत्रक:
०७ ऑक्टोबर। पहिली टी२० । रांची
१० ऑक्टोबर। दुसरी टी२० । गुवाहाटी
१३ ऑक्टोबर। तिसरी टी २० । हैद्राबाद