भारतीय संघाने अॅडलेड ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला. हा विजय भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरला असून त्यांनी प्रथमच ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत पहिल्या सामन्यात पराभूत केले आहे.
त्यामुळे या मैदानावर भारताचे दोन कसोटी विजय झाले असून या दोन्ही विजयात साम्य असल्याचे दिसून येत आहे.
या मैदानावरचा हा भारतीय संघाचा दुसरा विजय असून 2003 मध्ये पहिला विजय मिळवला होता. हे दोन्ही विजय भारताने सांघिक कामगिरी करत मिळवले आहेत. यावेळी भारत चौथ्या डावात लक्ष्याचा बचाव करत होता. तर 2003 मध्ये लक्ष्याचा पाठलाग करत होता.
तसेच या दोन्ही सामन्याचे सामनावीर पुरस्काराचे मानकरी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी खेळाडू करणारे ठरले आहेत. 2003मध्ये राहुल द्रविड तर 2018मध्ये चेतेश्वर पुजारा यांना सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
2003मध्ये द्रविडने भारताच्या पहिल्या डावात 233 आणि दुसऱ्या डावात नाबाद 72 धावा केल्या होत्या. तर पुजाराने भारताच्या पहिल्या डावात 123 आणि दुसऱ्या डावात 71 धावा केल्या आहेत.
पुजाराने पहिल्या डावात त्याचे 16 वे कसोटी शतक पूर्ण केले. त्याचबरोबर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पाही पार केला आहे. हा टप्पा त्याने 108 डावांमध्ये पूर्ण केला आहे.
विशेष म्हणजे द वॉल अशी ओळख असणारा राहुल द्रविडनेही 5000 कसोटी धावा या 108 डावांमध्येच पूर्ण केल्या होत्या. तसेच द्रविड आणि पुजारा यांनी 3000 आणि 4000 कसोटी धावाही सारख्याच डावांमध्ये पूर्ण केल्या आहेत. त्यांनी त्यांचे 3000 कसोटी धावा 67 डावांमध्ये तर 4000 कसोटी धावा 84 डावांमध्ये पूर्ण केल्या होत्या.
14 डिसेंबरपासून पर्थमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. यामध्येही पुजाराने त्याचा फॉर्म कायम ठेवावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–Video: स्वत:चाच व्हिडिओ पाहून विराट कोहलीला आवरता आले नाही हसू
–ऑस्ट्रेलियाच्या या मोठ्या स्पर्धेत नाणेफेकी ऐवजी या अनोख्या पद्धतीचा होणार अवलंब
–आयसीसी क्रमवारीत पुजारा, अश्विन, बुमराहची मोठी झेप तर सलामीवीरांची घसरण