---Advertisement---

बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत केवळ 3 भारतीय फलंदाजांना झळकावता आलंय द्विशतक, कोहलीचा यादीत समावेश

On: बुधवार, सप्टेंबर 11, 2024 5:44 PM
Virat Kohli Rohit Sharma
---Advertisement---

India vs Bangladesh Test Series : भारत विरुद्ध बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. यासाठी दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत. यजमान भारतीय संघ दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर परतेल. तर पाहुण्या बांगलादेशने मागील मालिकेत पाकिस्तानला पराभूत केल्याने त्यांचा आत्मविश्वास दुणावला असेल. आता या दोन्ही संघातील लढतीसाठी आठवड्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे.

दरम्यान, भारत आणि बांगलादेशचे संघ जेव्हाही कसोटीत आमनेसामने आले, तेव्हा कोणत्या फलंदाजाने द्विशतक झळकावले आहे, याबद्दलची माहिती आपण येथे घेणार आहोत.

सचिन तेंडुलकर
बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत माजी भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरने पहिले द्विशतक झळकावले होते. 2004 मध्ये जेव्हा भारतीय संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा सचिन तेंडुलकरने ढाका येथे या संघाविरुद्ध नाबाद 248 धावांची शानदार खेळी केली होती. ही दोन देशांमधील कसोटी मालिकेतील आतापर्यंतची सर्वात मोठी खेळी आहे. म्हणजे आजपर्यंत भारत किंवा बांगलादेशचे फलंदाज एकमेकांविरोधात खेळताना 248 पेक्षा जास्त धावांची खेळी करू शकले नाहीत.

मयंक अग्रवाल
यानंतर मयंक अग्रवालचे नाव येते. त्याने 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले होते. इंदूरमध्ये झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश कसोटीत मयंक अग्रवालने 243 धावा केल्या होत्या. यादरम्यान मयंक अग्रवालने आपल्या खेळीत 8 षटकार ठोकले होते. मात्र, त्यानंतर भारत किंवा बांगलादेशपैकी कोणत्याही संघातील एकाही फलंदाजाला द्विशतक करता आलेले नाही.

विराट कोहली
मयंक अग्रवालपूर्वी 2017 मध्ये बांगलादेशचा संघ भारतात आला होता तेव्हा विराट कोहलीने द्विशतक झळकावले होते. हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात कोहलीने 204 धावा केल्या होत्या. त्याच्या खेळीत एकही षटकार नव्हता, पण त्याने 24 चौकार मारले होते.

आता भारत विरुद्ध बांगलादेश संघातील आगामी कसोटी मालिकेत कोणत्या संघाचा खेळाडू द्विशतक झळकावण्याचा पराक्रम करू शकतो, हे पाहावे लागेल.

हेही वाचा-
IND vs BAN: कडेकोट बंदोबस्तात खेळवली जाणार कानपूर कसोटी, खेळाडूंसाठीही विशेष सुरक्षा व्यवस्था
99 टक्के मेहनत, 1 टक्के मज्जा, रोहित शर्माचा हा व्हिडिओ तुम्ही 1000 वेळा पाहाल
7 षटकार 52 धावा, 273 चा स्ट्राईक रेट, मुंबईच्या माजी क्रिकेटरचा विध्वंसक अंदाज!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---