भारतीय संघ सध्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील 3 सामन्यांची टी20 मालिका 1-1 अशी बरोबरीमध्ये सुटली. आता भारत आणि आॅस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे.
या कसोटी मालिकेला 6 डिसेंबरपासून अॅडलेड येथे सुरुवात होणार आहे. पण त्याआधी भारतीय संघ सिडनीमध्ये आजपासून(28 नोव्हेंबर) चार दिवसीय सराव सामना खेळणार आहे. मात्र या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी सिडनीमध्ये जोरजार पाऊस झाल्याने पहिल्या दिवसाचा खेळावरही पाणी फेरले गेले.
त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने ड्रेसिंग रुममध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जिममध्ये घाम गाळणे पसंत केले आहे. विराटला जिममध्ये, ट्रेनर शंकर बासू, सलामीवीर फलंदाज मुरली विजय आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माने सोबत केली आहे.
या दरम्यानचा फोटो विराटने सोशल मिडियावर शेअर केला आहे. यात त्याने म्हटले आहे की ‘पाऊस थांबेल असे वाटत नाही. त्यामुळे आम्ही ठरवले की दिवसभरात काहीतरी करावे. या खेळांबरोबर चांगले वर्कआऊट झाले.’
The rain doesn't seem to be going away so we decided to make something of our day ✌️💪. Gotta love a good workout with the boys. #makeeverydaycount pic.twitter.com/E94yPIcpRv
— Virat Kohli (@imVkohli) November 28, 2018
सिडनीमध्ये पाऊस झाल्याने खेळाडूंना मैदानात येताच आले नाही. हा पाऊस मंगळवारी रात्रीपासून सुरु झाला होता. त्यामुळे मैदान ओले होते. त्यामुळे तेथील स्थानिक वेळेप्रमाणे दुपारी 1 वाजता पाऊस थांबला आणि मैदान खेळण्यासाठी तयार करण्यात आले होते. नाणेफकही 3.30 वाजता होणार होती. पण अखेर पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
त्याचबरोबर गुरुवारीही सकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण दुपारनंतर खेळ होऊ शकेल.
महत्त्वाच्या बातम्या:
–पाकिस्तानचं टेन्शन वाढलं, टीम इंडियाने घेतला हा मोठा निर्णय
–मिताली राज- हरमनप्रीत प्रकरण काही थांबेना, पुन्हा नवा खुलासा जगासमोर
–ज्या विक्रमासाठी सचिनला २१ वर्ष लागली तो विराट केवळ ७ वर्षांत मोडणार
–मैदानाबरोबर मैदानाबाहेरही विराट धोनीला ठरणार सरस
–हा दिग्गज म्हणतो, पहिल्या कसोटीत रोहित शर्मा नकोच