लीड्स। मंगळवारी (17 जुलै) भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना पार पडणार आहे. 3 सामन्यांची ही मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने हा सामना निर्णायक ठरणार आहे.
या मालिकेतील पहिला सामना (12 जुलै) भारताने 8 विकेट्सने जिंकत मालिकेत आघाडी घेतली होती. या सामन्यात रोहित शर्माने शतक करत आणि कुलदिप यादव 6 विकेट्स घेत महत्त्वाची कामगिरी बजावली होती.
मात्र 14 जुलैला झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातून इंग्लंडने पुनरागमन करत हा सामना 86 धावांनी जिंकून मालिकेत बरोबरी साधली. या सामन्यात इंग्लंडचा फलंदाज जो रुटने शतक केले होते.
भारताने 2011 पासुन इंग्लंड विरुद्ध द्विपक्षीय वनडे मालिकेत पराभव स्विकारलेला नाही. त्यामुळे आता या मालिकेत विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक असतील.
इंग्लंड आणि भारत यांच्यात याआधी 98 वनडे सामने झाले आहेत. त्यातील 53 सामन्यात भारताने तर 40 सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. तसेच भारताने इंग्लंडमध्ये 40 वनडे सामने खेळले असुन त्यातील 16 सामन्यात विजय मिळवण्यात भारताला यश आले आहे. तर 20 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.
या बरोबरच तिसरा वनडे होत असलेल्या लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर याआधी या दोन संघात आत्तापर्यंत 6 वनडे सामने झाले असुन यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश आले आहे, तर 4 सामन्यात पराभूत व्हावे लागले आहे. तसेच इंग्लंडने या मैदानावर झालेले मागील चारही वनडे सामने जिंकले आहेत.
या सामन्यात भारताच्या कुलदिप यादव, युजवेंद्र चहल, विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. त्याचबरोबर इंग्लंडच्या इयान मॉर्गन, जॉस बटलर, बेन स्टोक्स, आदिल रशीद, जो रुट, जॉनी बेअरस्टो यांच्याकडून या सामन्यासाठी चांगल्या कामगिरीची चाहत्यांना आपेक्षा असेल.
इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे तिसरा वनडे सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा वनडे सामना 17 जुलै 2018 ला होणार आहे.
कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा वनडे सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा वनडे सामना लीड्स येथील हेडिंग्ले मैदानावर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा वनडे सामना?
भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 5.00 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा वनडे सामना पाहता येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, एमएस धोनी, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, हर्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, श्रेयस अय्यर, सिद्धार्थ कौल, अक्षर पटेल, उमेश यादव, शार्दुल ठाकूर, भुवनेश्वर कुमार.
इंग्लंड: इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, जोस बटलर, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, डेव्हिड विली, मार्क वुड, जेम्स विन्स