ब्रिस्टल। भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेत रविवारी 8 जुलैला होणारा शेवटचा आणि निर्णायक सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकाही जिंकण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.
3 सामन्यांची टी 20 मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीची झाली आहे. भारताने पहिला सामना 8 विकेट्स जिंकून मालिकेत आघाडी मिळवली होती. परंतू यजमान इंग्लंडने दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन केले.
6 जुलैला पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात अॅलेक्स हेल्सने केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ मालिका विजयासाठी उत्सुक असतील.
या दोन संघात आत्तापर्यंत 13 टी20 सामने झाले असुन त्यातील 6 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे, तर इंग्लंडने 7 सामने जिंकले आहेत. तसेच इंग्लंडमध्ये 5 सामने झाले असुन त्यामध्ये भारताला फक्त एक सामना जिंकण्यात यश मिळाले आहे.
त्याचबरोबर तिसरा सामना ब्रिस्टलच्या, कौंटी ग्राउंडवर होणार असुन या मैदानावर अजून एकदाही भारत आणि इंग्लंडमध्ये टी20 सामना झालेला नाही.
जर भारताने ही मालिका जिंकल्यास भारत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये टी20 मालिका विजय साजरा करेल.
इंग्लंड विरुद्ध भारत कधी होणार आहे तिसरा टी20 सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी20 सामना 8 जुलै 2018 ला होणार आहे.
कोठे होईल इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी२० सामना?
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी२० सामना ब्रिस्टल येथील कौंटी ग्राउंडवर होणार आहे.
किती वाजता सुरु होईल इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी२० सामना?
भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 6.30 वाजता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसऱ्या टी२० सामन्याला सुरुवात होईल.
इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा टी२० सामना कोणत्या चॅनेलवर पाहता येईल?
सोनी सिक्स आणि सोनी सिक्स एचडी या चॅनेल्सवरुन प्रेक्षकांना इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी२० सामना पाहता येणार आहे.
इंग्लंड विरुद्ध भारत तिसरा टी२० सामना ऑनलाइन कसा पाहता येईल?
sonyliv.com या वेबसाईटवर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा टी२० सामना ऑनलाइन पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ:
भारत: विराट कोहली(कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, एमएस धोनी,हर्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, सिद्धार्थ कौल, उमेश यादव.
इंग्लंड: इयान मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, जेक बॉल, जॉस बटलर, सॅम करन, अॅलेक्स हेल्स, क्रिस जॉर्डन,लिआम प्लंकेट, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, डेव्हिड विली आणि डेविड मलान.
महत्त्वाच्या बातम्या:
-२०१० साली झालेल्या आयपीएल स्पर्धेतील मोठ्या घटनेचा खुलासा
-काय सांगता! धोनीवर पुन्हा चित्रपट बनणार?