लंडन। भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना गुरुवार पासून (9आॅगस्ट) सुरु होणार होता. परंतू पहिल्याच दिवशी पावसाचा व्यत्यय आल्याने खेळ होऊ शकला नाही.
लंडनमध्ये सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने या सामन्यात पहिल्या दिवशी नाणेफेकही झाली नाही. पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असल्याची आयसीसी तसेच बीसीसीआयच्या ट्विटरवरुन माहिती देण्यात आली आहे.
PLAY ABANDONED.
Day one of the second #ENGvIND Test at the @HomeOfCricket was declared a wash-out. pic.twitter.com/RSrfMqXN7p
— ICC (@ICC) August 9, 2018
तसेच पावसामुळे खेळपट्टीवरही कव्हर टाकण्यात आले असल्याचा फोटो बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे.
Update – Day 1 play has been called off here at @HomeOfCricket.#ENGvIND pic.twitter.com/hCY5Z2dHC6
— BCCI (@BCCI) August 9, 2018
त्यामुळे आता उद्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ सुरु होइल अशी सर्वांची अपेक्षा आहे.
भारतीय संघाला पहिला सामना 31 धावांनी गमवावा लागला होता, त्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या सामन्यातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. पण त्याचबरोबर इंग्लंडचा संघही त्यांची विजयी लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.
आत्तापर्यंत भारताने इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्स मैदानावर 17 कसोटी सामने खेळले असून त्यातील 2 सामन्यात भारताला विजय मिळवता आला आहे. तसेच 11 सामन्यात पराभव पत्करला आहे, तर 4 सामने अनिर्णित राहिले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाकडून खेळणाऱ्या ११ खेळाडूंची यादी सोशल माध्यमांवर लिक
–फक्त त्या कारणामुळे भारतच मारणार लॉर्ड्सचे मैदान!
–मास्टर ब्लास्टर तेंडुलकरने लॉर्ड्सवरील घंटा वाजवल्यानंतर होणार भारत-इंग्लंड कसोटी सामन्याला सुरुवात






