---Advertisement---

सामन्यानंतर रोहित शर्मानं दिला पत्नी रितिका सजदेहला फ्लाइंग किस, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जून 28, 2024 6:05 PM
Rohit Sharma And Ritika Sajdeh
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) सेमीफायनल 2 सामना भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये खेळला गेला. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 68 धावांनी धुव्वा उडवला आणि फायनलसाठी तिकीट पक्कं केलं. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघ या विश्वचषकात चमकदार कामगिरी करत आहे. परंतू सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्मानं त्याच्या पत्नीला फ्लाइंग किस दिला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) त्याची पत्नी रितिका सजदेहशी (Ritika Sajdeh) इशाऱ्यांनी बोलत होता. नंतर त्यानं फ्लाइंग किस दिला. रितिका सजदेहसोबतच अनेक खेळाडूंच्या पत्नी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी आल्या आहेत. भारतानं खेळलेल्या विश्वचषकाच्या बऱ्याच सामन्यादरम्यानं रितिका सजदेह भारतीय संघाला पाठिंबा देताना दिसून आली आहे.

 

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर या सामन्यात भारतानं इंग्लंडला 68 धावांनी धूळ चारली. इंग्लंडनं टाॅस जिंकून भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रत्युत्तरात भारतानं 7 गडी गमावून 171 धावा ठोकल्या. त्यामध्ये कर्णधार रोहित शर्मानं शानदार अर्धशतक झळकावलं. तर सूर्यकुमार यादवनं 47 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

भारतानं दिलेल्या 172 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेला इंग्लंड संघ 103 धावांवरतीच ढेपाळला. भारताच्या गोलंदाजांनी त्यांना डोकचं वर काढू दिलं नाही. कर्णधार जोस बटलर 23 धावा आणि हॅरी ब्रुक 25, जोफ्रा आर्चर 21 धावांच्या जोरावर इंग्लंडनं केवळ 103 धावा बनवल्या.

भारतासाठी फिरकीपटू अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी सर्वाधिक 3-3 बळी घेतले. तर अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनं 2 विकेट्स घेत भारताला सामना जिंकून दिला. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार 3 विकेट्स घेतलेल्या फिरकीपटू अक्षर पटेलला (Axar Patel) देण्यात आला.

आता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फायनल सामना खेळला जाणार आहे. शनिवारी (29 जून) बार्बाडोसच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

शफाली वर्मानं रचला इतिहास! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलं वेगवान द्विशतक
इंग्लंडच्या पराभवानंतर माजी कर्णधारचा गंभीर अरोप, हरभजन सिंगने दिले सडेतोड उत्तर
भारत-दक्षिण आफ्रिका फायनलमध्ये कोणाचं वर्चस्व? जाणून घ्या हेड टू हेड रेकाॅर्ड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---