भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेला येत्या २३ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाने २१ मार्च रोजी पुण्यात हजेरी लावली आहे. याचे फोटो भारतीय खेळाडूंनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. तसेच ३ सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ पुण्यातील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार आहे.
टी-२० मालिकेत इंग्लंड संघाला ३-२ ने पराभूत केल्यानंतर, भारतीय संघासमोर एकदिवसीय मालिकेतही इंग्लंड संघावर विजय मिळवण्याचे आव्हान असणार आहे. या मालिकेतील ३ सामने २३, २६ आणि २८ मार्च रोजी खेळवण्यात येणार आहेत. ही मालिका पुण्यातील, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
अशातच पाहुणचार करण्यात कुठलीही कमतरता भासू नये म्हणून भारतीय संघाला पुण्यातील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल, कॉनराड पुणेमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. हे हॉटेल संगमवाडी परीसरातील मंगलदास रस्त्यालगत आहे.
या हॉटेलची ओळख म्हणजे, हे हॉटेल पुण्यातील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल्सपैकी एक आहे. हे हॉटेल बाहेरून पाहायला जितके आकर्षक आहे, तसेच ते आतूनही आहे. या हॉटेलमध्ये सर्व प्रकारच्या प्रेसिडेन्शियल सुट, एक्झिक्युटिव्ह रूम, डबल क्वीन प्रीमियर रूम, डिलक्स रूमचा समावेश आहे.
तसेच खेळाडूंना फिटनेससाठी जिम आणि योगा करण्यासाठी योगा रूमदेखील आहे, ज्यामध्ये खेळाडू मुक्तपणे व्यायाम करू शकतील.
तसेच या हॉटेलमध्ये भारतीय, एशियन, इटैलियन, चाइनीज, कॉन्टिनेंटल असे सर्व प्रकारचे खाद्य पदार्थ उपलबध आहेत.
खेळाडूंसाठी या हॉटेलमध्ये भव्य स्विमिंगपुल देखील आहे. तसेच स्पा, सलून यासारख्या सेवादेखील या हॉटेलमध्ये दिल्या जातात.
वनडे मालिकेसाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सने रिलीज केल्यानंतर ‘या’ खेळाडूंचे IPLमध्ये शानदार प्रदर्शन; एक तर ठरला ‘मॅच विनर’
‘त्याच्या’मुळेच विराटला टी२०त करता आली ओपनिंग; झहीर खानची युवा खेळाडूवर कौतुकाची थाप
वयाच्या २०व्या वर्षी राधा यादवचा ‘विश्वविक्रम’; केला कुणालाही न जमलेला किर्तीमान