---Advertisement---

पक्काचं समजा! टी२० मालिकेत भारताचा विजय जवळपास निश्चित, असं आम्ही नाही ही आकडेवारी सांगते

On: मंगळवार, मार्च 9, 2021 11:39 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी ३-१ च्या फरकाने खिशात घातली आहे. त्यानंतर या उभय संघात १२ मार्च ते २० मार्च या कालावधीत ५ सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हे सामने होणार आहे. कसोटी मालिकेप्रमाणे टी२० मालिकेतही भारतीय संघाच्या विजयाच्या अपेक्षा अधिक आहेत. भलेही इंग्लंडचा टी२० संघ खूप खतरनाक आहे, मात्र भारताविरुद्धची त्यांची टी२० आकडेवारी जास्त विशेष राहिलेली नाही.

भारत-इंग्लंड यांच्यातील टी२० आकडेवारी
आजवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात एकूण १४ टी२० सामने झाले आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी ७ सामने जिंकले आहेत. हेच जर मागील ५ सामन्यांची आकडेवारी पाहायची झाली तर, भारताचे पारडे इंग्लंडपेक्षा अधिक जड असल्याचे दिसून येते. भारत-इंग्लंड दरम्यान झालेल्या मागील ५ टी२० सामन्यांतील ४ सामने भारताने जिंकले आहेत. तर केवळ एका सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

एवढेच नव्हे तर, २०१८ मध्ये भारत आणि इंग्लंड संघात झालेल्या शेवटच्या टी२० मालिकेतही भारताने २-१ ने विजयी पताका झळकावली होती. या मालिकेतील अखेरच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्माने ५६ चेंडूत शतक झळकावले होते. दरम्यान त्याने ५ खणखणीत षटकार आणि ११ चौकार मारले होते. भारताने या सामन्यासह टी२० मालिकेतही विजय मिळवला होता. रोहितला या सामन्यात सामनावीर पुरस्कार देण्यात आला होता.

मॉर्गन-बटलर भारतीय संघासाठी धोक्याची घंटा
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या टी२० स्वरुपात इंग्लंड संघाचे नेतृत्त्वपद इयॉन मॉर्गनच्या हाती असणार आहे. त्याच्याबरोबर जोस बटलर, डेविड मलान आणि बेन स्टोक्स असे धाकड फलंदाज भारतीय गोलंदाजांची धुलाई करू शकतात.

युवा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष
यंदाच्या भारतीय टी२० संघात बऱ्याच नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. संघ व्यवस्थापनाने इशान किशन, सूर्यकुमार यादव, राहुल तेवतिया अशा प्रतिभाशाली युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटची मैदाने या खेळाडूंनी गाजवली आहेत. आता टी२० मालिकेत इंग्लंडविरुद्ध हे खेळाडू कशी कामगिरी करतात, यावर सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

टी२० विश्वचषक: ‘गब्बर’चं स्थान धोक्यात, रोहितसोबत ‘हा’ फलंदाज उतरणार सलामीला?

लिपिकाच्या मुलाचा किर्तीमान! अवघ्या २५ चेंडूत झळकावले शतक, संघाची सेमी फायनलमध्ये धडक

मास्टर ब्लास्टरचं क्रिकेटप्रेम, दुखापत झाली तरीही सुई घेऊन मैदानात उतरणार; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---