इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूंनी लंडनला पोहोचल्यानंतर सराव सुरू केला आहे. कर्णधार रोहित शर्माही संघात सामील झाला आहे. वैयक्तिक कारणांमुळे उर्वरित खेळाडूंनंतर एका दिवसानंतर त्याने लंडनला जाणारे विमान पकडले होते. या दौऱ्यात भारत २३ जूनपासून लिसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना खेळणार आहे आहे. रविचंद्रन अश्विन कोरोना पॉजिटिव्ह आल्याने सामने सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला धक्का बसला आहे. त्यातच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
झाले असे की, विराट आणि रोहित यांना मोकळा वेळ मिळाल्याने ते लंडनमध्ये खरेदीसाठी बाहेर पडले. यादरम्यान त्यांनी चाहत्यांना निराश न करता सेल्फी काढल्या. त्यांच्या या प्रकारामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. इंग्लंडमध्ये कोरोनाचे प्रमाण असतानाच भारतीय खेळाडूंनी अशाप्रकारे बाहेर फिरणे योग्य नाही. बीसीसीआयच्या मते, या दौऱ्यात कोणत्याच भारतीय खेळाडूला कसलीही अडचण येणार नाही याची काळजी आम्ही घेत आहेत.
लिसेस्टरशायर या काऊंटी क्लब विरुद्ध भारतीय संघाला सराव सामना खेळायचा असून, रोहित-विराटने मागील काही दिवसांपूर्वी लिसेस्टर आणि लंडन येथे चाहत्यांबरोबर सेल्फी काढल्या होत्या. यावेळी त्यांनी मास्क न लावता शॉपिंगही केली होती. बीसीसीआयचे सहअध्यक्ष अरूण धुमाळ यांनी खेळाडूंचा हा प्रकार गंभीरपणे हाताळत त्यांना परत अशी चूक करू नका असे सांगितले आहे. त्यांनी इनसाईटस्पोर्टशी बोलताना म्हटले, इंग्लंड येथे कोरोनाचे प्रमाण कमी असले तरी खेळाडूंनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. आम्ही संघाला सावध राहण्यास सांगणार आहोत.
इंग्लंडमध्ये दरदिवसा ९००० पेक्षा अधिक कोरोना रूग्ण आढळत आहेत. रोहित-विराटला कदाचित आयसोलेशनमध्येही ठेवले जाईल. ते दोघे पहिल्या सामन्यासाठी मुकण्याची शक्यता आहे. इंग्लंडला जाण्यापूर्वी विराट कोविड पॉजिटिव्ह आढळला होता. त्यातून तो बरा झाल्यावर इंग्लंड दौऱ्यासाठी रवाणा झाला होता.
भारतीय संघ या दौऱ्यात १ ते ५ जुलै दरम्यान एजबस्टन, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहेत. त्याआधी ते २३ ते २६ जूनला लिसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळणार आहेत. अश्विन वगळता भारतीय संघाचे सर्व खेळाडू इंग्लंडला पोहोचले असून अश्विन कोरोना पॉजिटिव्ह आढळला आहे. तो पाचव्या कसोटीपूर्वी बरा होऊ शकतो. यामुळे त्याची पाचव्या कसोटीसाठी संघात जागा पक्की असण्याची शक्यता आहे.
भारताच्या शेवटच्या इंग्लंड दौऱ्यावर कोरोनामुळे मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी रद्द करावी लागली होती. २०२२ मध्ये भारताच्या इंग्लंड दौऱ्यात ही एकमेव कसोटी खेळली जाईल, असे त्यावेळी ठरले होते. त्यामुळे या दौऱ्यावर दोन्ही संघांदरम्यान १ कसोटी सामना खेळवला जात आहे. भारतीय संघ कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. एकमेव कसोटीनंतर भारताला इंग्लंडकडून तीन टी२० आणि तितक्याच एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. या दौऱ्यातील शेवटचा वनडे १७ जुलै रोजी मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा डेविड वॉर्नर ठरला दुसराच खेळाडू
ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३० वर्षानंतर प्रथमच श्रीलंका संघाने रचला ‘हा’ इतिहास