---Advertisement---

हाँगकाँगच नाणं खणकलंय! नाणेफेक जिंकत घेतलाय गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग 11

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 7:08 PM
IND-vs-HK
---Advertisement---

आशिया चषक 2022 स्पर्धा सध्या मध्यभागावर आहे. या स्पर्धेतील भारताच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला मात दोऊन भारत दोन पाऊले पुढे उभा आहे. अशा परिस्थितीत भारताचा लीग स्टेडमधील दुसरा आणि शेवटचा सामना हाँगकाँग विरुद्ध आयोजित आहे. या सामन्याला सध्या सुरुवात होत आहे. सुपर 4 मध्ये थेट प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने भारतासाठी हा सामना महत्वाचा मानला जात आहे. या महत्वपूर्ण सामन्यात हाँगकाँग संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

भारताने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करत स्पर्धेत एक पाऊसल पुढे टाकले आहे. दुसरीकडे हाँगकाँग संघाचा मुख्य स्पर्धेतील हा पहिलाच सामना आहे. यााधी क्वालिफायर स्पर्धेतील तिनही सामन्यात हाँगकाँगने विजय मिळवला आहे. त्यामुळे हाँगकाँगचा संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रदर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष म्हणजे 4 वर्षांपूर्वी हे दोन्ही संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी हाँगकाँग संघाने भारताला चांगली टक्कर देत सामना रोनमांचक बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे होते. मात्र, त्यावेळी हा सामना वनडे प्रकारात खेळवला गेला होता. आणि यंदाच्या वर्षी हा सामना टी20 प्रकारात खेळवला जात आहे. या दोन्ही संघांमध्ये हा पहिलाच टी20 सामना असल्याने हाँगकाँग भारतासाठी काही अडचणी निर्माण करत हा सामना रोमांचक बनवू शकेल का यावर सर्वांची नजर असेल.

भारताने या सामन्यात पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यातील सामनावीर हार्दिक पंड्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी संघात रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या हार्दिकचे चाहते नाराज असले तरी रिषभच्या चाहत्यांमध्ये उत्साह असल्याचे पाहायला मिळत आहे.

या सामन्यासाठी दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक),  दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, रविंद्र जडेजा,आवेश खान, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल

हाँगकाँग: निझाकत खान (कर्णधार), यासीम मुर्तझा, बाबर हयात, किंचित शाह, एजाज खान, स्कॉट मॅकेनी (यष्टीरक्षक), झीशान अली, हारून अर्शद, एहसान खान, आयुष शुक्ला, मोहम्मद गझनफर

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मास्टर ब्लास्टर सलग दुसऱ्यांचा भारताला बनवणार चॅम्पियन! करणार ‘या’ संघाचे नेतृत्व
हॉंगकॉंगच्या गोलंदाजाने स्विकारलेय विराटला बाद करण्याचे चॅलेंज; चार वर्षांपूर्वी रोहित-धोनीला दाखवलेला तंबूचा रस्ता
भारत-पाकिस्तानचे संघ सापडले नियमाच्या कचाट्यात! आयसीसीने केली दोन्ही संघांवर कठोर कारवाई

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---