---Advertisement---

टॉप 5: दुसऱ्या टी20 मध्ये भारतीय संघाने केले हे खास विक्रम

On: शनिवार, जून 30, 2018 7:00 AM
---Advertisement---

आयर्लंड विरुद्ध भारत संघात 29 जूनला पार पडलेल्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने 143 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने 2 सामन्यांची टी20 मालिका 2-0 ने जिंकत आयर्लंडला व्हाईटवॉश दिला.

भारताच्या या विजयात कुलदिप यादव आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 3 विकेट्स घेऊन महत्त्वाची कामगिरी बजावली.

याबरोबरच केएल राहुल, सुरेश रैना यांनीही अर्धशतके करुन मोलाचा वाटा उचलला. तसेच हार्दिक पंड्याने अखेरच्या काही षटकात केलेली फटकेबाजी भारताला 200 धावांचा टप्पा पार करण्यासाठी महत्त्वाची ठरली.

भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 213 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 12.3 षटकात 70 धावांवर सर्वबाद झाला.

या विजयाबरोबरच भारतीय संघाने खास विक्रम केले आहेत-

– आंतरराष्ट्रीय टी20 इतिहासात धावांच्या स्वरुपातील संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विजय. पाकिस्ताननेही विंडिज विरुद्ध 2018 मध्येच 143 धावांनी विजय नोंदवला आहे.

– भारताने याआधी कधीही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 100 पेक्षा जास्त धावांनी विजय मिळवलेला नाही.

– भारत आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक वेळा 200 धावसंख्या पार करण्यात दक्षिण आफ्रिकेसह संयुक्तपणे अव्वल स्थानावर. दोन्ही संघानी आत्तापर्यंत 11 वेळा केला आहे असा कारनामा.

– आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच भारताने सलग दोन वेळा पार केला 200 धावांचा टप्पा. आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात 208 धावा तर दुसऱ्या सामन्यात 213 धावा.

– 213 धावा ही भारताची चौथ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या.

महत्त्वाच्या बातम्या:

एमएस धोनीला आयर्लंड विरुद्धच्या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात स्थान नाही!

टीम इंडिया रिलॅक्स, डब्लिन शहरात घेतेयं सहलीचा आनंद

स्मिथला खेळताना पाहुन राशीद खानने असा व्यक्त केला आनंद!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment