भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. तसेच न्यूझीलंड संघ प्रतिष्ठा राखण्यासाठी विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. दोन्ही सामन्यात भारताने मोठ्या फरकाने न्यूझीलंडला पराभूत केले आहे. पहिल्या सामन्यात भारताने ५ विकेट्सने, तर दुसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने न्यूझीलंडला पराभूत केले आहे. त्यामुळे सध्या मालिकेत भारतीय संघ २-० अशा आघाडीवर आहे.
आमने-सामने कामगिरी
भारत आणि न्यूझीलंड संघात टी२० क्रिकेटमध्ये १९ सामने झाले आहेत. त्यातील ८ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे, तर न्यूझीलंडने ९ सामने जिंकले आहेत. तसेच २ सामने बरोबरीत सुटले होते, ज्यात भारताने सुपर ओव्हरमध्ये बाजी मारलेली.
भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या टी२० सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना २१ नोव्हेंबर २०२१ रोजी खेळला जाणार आहे.
२. भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना इडन गार्डन, कोलकाता येथे खेळवला जाईल.
३. भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्या. ६.३० वाजता नाणेफेक होईल.
४. भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा टी२० सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण हॉटस्टार या ऍपवर पाहाता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
भारतीय संघ: केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), वेंकटेश अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, आवेश खान, इशान किशन, मोहम्मद सिराज, ऋतुराज गायकवाड
न्यूझीलंड संघ: मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सिफर्ट (यष्टीरक्षक), जेम्स नीशम, मिशेल सॅंटनर, ऍडम मिल्ने, टिम साउथी (कर्णधार), इश सोधी, ट्रेंट बोल्ट, टॉड ऍस्टल, लॉकी फर्ग्युसन, रचिन रवींद्र.
महत्त्वाच्या बातम्या –
‘रोहित-राहुल आहेत; मात्र, तिसरा सलामीवीर शोधावा लागेल’; भारतीय दिग्गजाने केले सावध
“चहलला अंतिम अकरात न खेळवणे मोठी चूक”; भारतीय दिग्गज भडकला
कर्णधार म्हणून स्मिथ करणार ऍशेससाठी ‘कमबॅक’? तीन वर्षांपूर्वी झालेली कारवाई