आज(8 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात(NZ Vs IND) इडन पार्कवर 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील(ODI Series) दुसरा सामना पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने 22 धावांनी विजय मिळवला आणि वनडे मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला असला तरी भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाच्या क्षेत्ररक्षणाचे कौतुक होत आहे. या सामन्यादरम्यान जडेजाने न्यूझीलंडचा उजव्या हाताचा मध्यमगती गोलंदाज जेम्स नीशमला(Jems Neesham) शानदार थ्रो फेकत धावबाद केले. त्याच्या ह्या शानदार थ्रोची सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.
बीसीसीआयने(BCCI) देखील जडेजाच्या ‘रॉकेट थ्रो’चा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकांउटवर शेअर केला आहे. “तुम्ही जडेजाच्या रॉकेट आर्मशी किंवा थ्रोशी पंगा घेऊ शकत नाही,” असे हे ट्विट आहे. याशिवाय जडेजाच्या या थ्रोचे व्हिडिओ आणि फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
You do not mess with the Jadeja rocket arm 🎯🎯#NZvIND pic.twitter.com/jqLVBhmzEF
— BCCI (@BCCI) February 8, 2020
झाले असे की, 35व्या षटकात न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर(Ross Taylor) आणि जेम्स फलंदाजी करत होते. तर, भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी गोलंदाजी करत होता. त्याने या षटकात टाकलेला दुसरा चेंडू टेलरने बॅकवर्ड पाँईट क्षेत्रात फटकावला आणि 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेल्या जडेजाने चेंडू आडवत स्ट्रायकर एन्ड्सच्या दिशेला थेट स्टम्पवर फेकला आणि स्ट्राइक एन्ड्सच्या दिशेने धाव घेत असणारा जेम्स धावबाद झाला. जेम्सच्या पुर्वी न्युझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिलला(Martin Guptill) देखील शार्दुल ठाकूरने धावबाद केले होते.
या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडने 8 बाद 273 धावा केल्या आणि भारयीय संघाला 274 धावांचे आव्हान दिले. मात्र भारतीय संघ 48.3 षटकात सर्वबाद 251 धावा करता आल्याने पराभव स्विकारावा लागला.