भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. विराटने मागील 4 वनडे डावात 3 शतके ठोकली आहेत. त्याची दोन शतके ही नुकत्याच पार पडलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत आली होती. यानंतर आता विराट न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारताच्या ताफ्यात सामील झाला आहे. या मालिकेतूनही चाहत्यांना विराटकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र, या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात विराट दोन आकडी धावसंख्याही करू शकला नाही. तो या सामन्यात लवकर तंबूत परतला. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
झाले असे की, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. रोहित आणि गिल चांगल्या लयीत होते. मात्र, रोहित 34 धावांवरच बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली फलंदाजीला आला. विराटने या सामन्यात फार चांगली कामगिरी करू शकला नाही.
डावाचे 16वे षटक टाकण्यासाठी न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर खेळपट्टीवर आला होता. यावेळी त्याने पहिला चेंडू टाकला, ज्यावर विराटला एकही धाव घेता आली नाही. त्यानंतर सँटनरच्या दुसऱ्या चेंडूने विराटला चकवत यष्टींचा वेध घेतला. त्यामुळे विराटला त्रिफळाचीत होऊन तंबूत परतावे लागले. विराट बाद झाला, तेव्हा तो 8 धावांवर खेळत होता. विराटने यादरम्यान 10 चेंडूंचा सामना करताना फक्त 1 चौकार मारला होता. विराट बाद झाला, तेव्हा संघाची धावसंख्या 2 बाद 88 धावा इतकी होती. आता विराट बाद झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli wicket 👀#INDvsNZ #INDvNZ pic.twitter.com/o0NWlKCZ4y
— Fans Crickets (@_fans_cricket) January 18, 2023
विराटची 2023मधील वनडेतील कामगिरी
विराट कोहलीने 2022 वर्षाचा शेवट वनडेत शतक ठोकत केला होता. त्यानंतर 2023 वर्षाची सुरुवात विराटने दिमाखात केली. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या आणि तिसऱ्या वनडे सामन्यात अनुक्रमे 113 आणि नाबाद 166 धावांची शतकी खेळी साकारली होती. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत तर विराट लवकर बाद झाला. मात्र, उर्वरित 2 वनडेत तो कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (india vs new zealand cricketer virat kohli clean bowled by mitchell santner)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित भाऊंचा विषयच खोल! पॉवरप्लेमध्ये 2 षटकार ठोकत मोडला धोनीचा विक्रम, बनलाय टेबल टॉपर
टॉसचा निकाल भारताच्या पारड्यात! दोन धुरंधरांचे पुनरागमन, तर ईशानचाही ताफ्यात समावेश