न्यूझीलंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या वन-डे मालिकेत अप्रतिम कामगिरी करणारा मोहम्मद शमी मालिकावीर ठरला. यामध्ये त्याने 4 सामन्यात खेळताना भारताकडून सर्वाधिक 9 विकेट्स घेतल्या. या सामन्यानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याचे कौतुक केले.
“मागील पाच महिन्यापांसून मी शमीची कामगिरी पहात आहे. त्याने संघात पुनरागमन करताना सगळ्याच प्रकारच्या क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे”, असे शास्त्री यांनी स्टार स्पोर्टशी बोलताना म्हटले आहे.
जून 2018मध्ये घेण्यात आलेल्या यो-यो टेस्टमध्ये शमी फेल झाला होता. फिटनेसच्या कारणावरुनच त्याला अफगाणिस्तान विरुद्ध 14 जून ते 18 जून दरम्यान होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघातून स्थान गमवावे लागले होते.
त्यानंतर त्याने संघात धडाकेबाज पुनरागमन करताना 2018 पासून दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात 61 विकेट्स घेतल्या आहेत.
यावेळी तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने 56 सामन्यात हा पराक्रम केला आहे. या आधी हा विक्रम अष्टपैलू इरफान पठाणच्या नावावर होता. इरफानने 59 सामन्यात असा कारनामा केला होता.
त्याचबरोबर शमी वन-डे मालिकेत मालिकावीर पुरस्कार पटकावणारा तिसराच भारतीय वेगवान गोलंदाज ठरला. त्याच्याआधी भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांनी मालिकावीराचे पुरस्कार पटकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
–२०१९च्या विश्वचषकात हा खेळाडू असणार रोहित-धवनला पर्याय
–पाचव्या वनडेनंतर चहलला पाहताच दूर पळाला एमएस धोनी, पहा व्हिडिओ
–१२०४ फलंदाजांनी ज्याचा विचारही केला नसेल तो विक्रम करण्यासाठी रोहित सज्ज