भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपवून रविवारी (20 जानेवारी) न्यूझीलंड दौऱ्यासाठी ऑकलंडला पोहचला. या दौऱ्यात 5 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिका होणार आहेत.
या मालिका सुरु होण्याआधी न्यूझीलंडचा स्फोटक फलंदाज रॉस टेलर याने एक महत्त्वपूर्ण सल्ला त्याच्या संघाला दिला आहे. त्याने भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली या दोघांना लवकर बाद केले तर आपण सहज सामने जिंकू असे मत मांडले आहे.
यावेळी टेलरने विराटला वन-डे क्रिकेटमधील सध्याचा सर्वोत्तम खेळाडू म्हणत त्याचे कौतुकही केले आहे.
“विराट हा सध्या खेळत असलेल्या खेळांडूपैकी वन-डेमधील सर्वोत्तम खेळाडू आहे. रोहित आणि धवन हे भारताचे सलामीवीरही उत्तम खेळत आहेत”, असे टेलर म्हणाला.
“विराट आणि रोहित या दोघांना लवकर बाद करण्याचे आमचे लक्ष्य असेल. यासाठी आमच्या वेगवान गोलंदाजांना चांगलीच मेहनत घ्यावी लागेल”, असेही टेलर म्हणाला.
विराटने एडलेड येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात शतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ पोहचवले होते. त्याने या 3 वन-डे सामन्यात 153 धावा केल्या आहेत.
रोहितनेही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शतकी खेळी केली होती. मात्र भारताला तो सामना गमवावा लागला होता. या दोघांप्रमाणेच यष्टीरक्षक एमएस धोनीही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सलग तीन अर्धशतके केली आहेत.
भारताने 2013-14मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. यामध्ये भारताला 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 4-0 असा सपाटून मार खावा लागला होता. यामुळे भारताचे आता ऑस्ट्रेलिया प्रमाणेच न्यूझीलंडमध्येही जिंकण्याचे लक्ष्य असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
–वनडेत धोनी करु शकतो मोठा धमका, सचिनच्या विक्रमावर आहे नजर
–तब्बल दोन महिन्यांनी पृथ्वी शाॅ या मालिकेत करणार कमबॅक
–Video: न्यूझीलंडला पोहचली टीम इंडिया, असे झाले स्वागत…