---Advertisement---

पाकिस्तानचा ‘हा’ माजी कर्णधार विराटला म्हणतो, “चिंता करू नको”

On: मंगळवार, मार्च 3, 2020 6:53 PM
---Advertisement---

पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक (Inzamam Ul Haq) यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) पाठिंबा दिला आहे. त्यांनी विराटला सध्याच्या फॉर्मबद्दल काही चिंता करण्याची गरज नाही असे म्हटले आहे. तसेच विराट पुढील सामन्यात दमदार खेळेल असा त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे (3 सामन्यांची) आणि कसोटी (2 सामन्यांची) मालिकेत व्हाईटवॉश मिळाला आहे. या दोन्ही मालिकेत विराटला चांगली फलंदाजी करता आलेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील एकाही डावात विराटला 20पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. त्याने या 2 सामन्यातील 4 डावात अनुक्रमे 2, 19, 3 आणि 14 अशा धावा केल्या आहेत.

इंजमाम यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवरती असे सांगितले आहे की, “अनेक लोक विराटच्या शैलीविषयी आणि अन्य गोष्टींविषयी नकारात्मक बोलत आहेत. मी हे सर्व ऐकून चकित झालो. विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याच शैलीचा वापर करून 70 शतक केले आहेत. तुम्ही अचानक त्याच्या फलंदाजीबद्दल असे बोलू शकत नाही.”

“एक क्रिकेटपटू म्हणून मी सांगू शकतो की खेळाडूंच्या क्रिकेट कारकिर्दीत अशा गोष्टी होत असतात, जेव्हा त्यांना अथक प्रयत्नानंतरही चांगल्या धावा घेता येत नाहीत.” असे इंजमाम यांनी पुढे सांगितले आहे.

मोहम्मद युसूफ यांच्यासोबतचा एक किस्सा सांगताना इंजमाम म्हणाले, “युसूफ फलंदाजी करताना बॅकलिफ्टचा अधिक वापर करत होता. त्याच्या या शैलीचा वापर करत तो दमदार फटकेबाजी करायचा. मात्र, जेव्हा त्याचा फॉर्म कमी झाला तेव्हा लोकांनी त्याच्या शैलीवर टीका करण्यास सुरुवात केली होती. यावेळी जेव्हा तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला, तू आतापर्यंत एवढ्या धावा कोणत्या शैलीचा वापर करत केल्या? एवढेच विचारले होते.”

इंजमाम यांनी विराटला त्याच्या फलंदाजी शैलीत कसलाही बदल न करण्याचा सल्ला देत म्हटले, “संघाने चांगली कामगिरी केली नाही. विराट टिकून खेळू शकला नाही तर अन्य खेळाडूंचे काय, तेही चांगले खेळू शकत होते. हा खेळाचा भाग आहे आणि सर्वांनी तो स्विकारायला हवा.”

विराटचा बचाव करत इंजमाम म्हणाले की, “कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ निघून जाईल. मला विराटच्या फलंदाजी शैलीबाबत काही बोलायचे नाही. त्याने आपली शैली बदलू नये. तो मजबूत मानसिकतेचा खेळाडू आहे. त्याला त्रास करुण घेण्याची गरज नाही. तो पुन्हा दमदार खेळेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहली म्हणतो,’…तर खेळाडूंनी ब्रेक घ्यावा’

टीम इंडियाचा टी२० वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये या संघाविरुद्ध होणार सामना

या तीन मोठ्या खेळाडूंचे होऊ शकते टीम इंडियात पुनरागमन

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---