बुधवारी (२३ जून) भारत आणि न्यूझीलंड संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना न्यूझीलंड संघाने ८ विकेट्सने जिंकत आयसीसीच्या पहिल्या वहिल्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. या सामन्यादरम्यान एक मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (India vs New Zealand World Test Championship Final Match NZ Fans Removed Their Clothes)
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले होते. यादरम्यान पहिल्या डावात भारतीय संघाने सर्वबाद २१७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाने सर्वबाद २४९ धावा केल्या आणि ३२ धावांची आघाडी घेतली होती. यानंतर भारताचा दुसरा डाव १७० धावांवर संपुष्टात आला.
अशाप्रकारे न्यूझीलंड संघाला केवळ १३९ धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करत असताना न्यूझीलंड संघाकडून रॉस टेलर आणि कर्णधार केन विलियम्सन फलंदाजी करत होते. यादरम्यान ३० व्या षटकादरम्यान विलियम्सन (१४) आणि टेलर (२६) धावांवर खेळत असताना स्टेडियममध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. तो होता न्यूझीलंडच्या चाहत्यांचा.
मजेशीर गोष्ट म्हणजे यादरम्यान चाहते चक्क कपडे काढून आपल्या संघाचा उत्साह वाढवत करत होते. यादरम्यान कुणी आपला टी-शर्ट हवेत फडकवत होते, तर कुणी जोरजोरात ओरडत होते. त्यानंतरही सामना संपेपर्यंत चाहत्यांनी असाच जल्लोष कायम ठेवला होता. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
There's a chorus of "Cricket's coming home" from the New Zealand fans.
Getting closer.
Live: https://t.co/D2IJjL89cm#bbccricket #NZvsIND #WTCFinal pic.twitter.com/lT8hvrlqbZ
— Test Match Special (@bbctms) June 23, 2021
3 from Ross Taylor pushes the runs required under 60! 59 needed now with Taylor 26* and Williamson 14* at the Hampshire Bowl. Follow play LIVE in NZ with @skysportnz. Card | https://t.co/9M1mvODiZ3 #WTC21 pic.twitter.com/woF9KLrCFD
— BLACKCAPS (@BLACKCAPS) June 23, 2021
चाहत्यांकडून साामन्यादरम्यान कपडे काढण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. यापूर्वीही अनेक सामन्यांमध्ये त्या त्या संघाच्या चाहत्यांनी आपले कपडे काढून जल्लोष साजरा केला होता.
न्यूझीलंड संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी तब्बल २१ वर्षांनंतर आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन ठरला २१ व्या शतकातील सर्वात महान कसोटी फलंदाज; ‘या’ दिग्गजाला मागे टाकत पटकावला मान
…अन् चाहत्यांचे सेलिब्रेशन क्षणात बदलले निराशेत, पाहा कॅमेरामनने टिपलेला भन्नाट व्हिडिओ