आशिया कप टी-२० स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आशिया चषक स्पर्धेचे मुख्य सामने २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये सुरू होत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना (IND vs PAK) २८ ऑगस्ट रोजी दुबईमध्ये होणार आहे. दोन्ही देशांचे क्रीडाप्रेमी या सामन्याची वाट पाहत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०२१च्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेट संघाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही देशांमधील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांबाबत बोलायचे झाले तर टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला आहे. कर्णधार रोहित तो कायम ठेवू इच्छितो. दोघांमध्ये आतापर्यंत नऊ टी-२० सामने खेळले गेले आहेत. भारताने ७ सामने जिंकले आहेत. दुसरीकडे पाकिस्तान संघ २ सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे.
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्डही चांगला आहे. भारताने आतापर्यंत ७ वेळा विजेतेपद पटकावले आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ केवळ २ वेळा चॅम्पियन बनू शकला आहे. आशिया चषक दुसऱ्यांदा टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे. २०१६मध्ये जेव्हा टीम इंडिया चॅम्पियन बनली तेव्हा पहिल्यांदाच याचे आयोजन करण्यात आले होते. जाणून घ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याशी संबंधित प्रत्येक माहिती
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ सामना कधी होणार?
आशिया चषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्ट (रविवार) रोजी सामना होणार आहे.
आशिया चषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना कोठे खेळला जाईल?
आशिया चषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ सामना कधी होणार?
आशिया चषक २०२२मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना संध्याकाळी ७.३० पासून खेळला जाईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ सामन्याचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक २०२२ सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कोठे पाहायचे?
डिस्ने + हॉटस्टार ऍपवर तुम्ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२२ सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. सामन्यांच्या लाइव्ह अपडेटसाठी आमचे अनुसरण करा
भारताची संभाव्य प्लेइंग ११: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
पाकिस्तानची संभाव्य प्लेइंग ११: बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, आसिफ अली, इफ्तिखार अहमद, हैदर अली, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह आणि शाहनवाज धनी .
आशिया कप २०२२ साठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि आवेश खान.
आशिया चषक २०२२ साठी पाकिस्तान संघ: बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहबाज धनी आणि उस्मान कादिर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आजच्याच दिवशी वाडेकरांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड भूमीवर रचलेला इतिहास
महाराजा टी२० ट्रॉफी: मयंकच्या शतकी ‘ब्लास्ट’ने बेंगलोर फायनलमध्ये; पाटीलचे शतक व्यर्थ
आठव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत सैनुमेरो जालन गोशॉक संघाची विजयी सलामी