अजमान । उद्या अंध क्रिकेट विश्वचषकात गतविजेता भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान अंतिम सामन्यात खेळणार आहेत. भारताने बुधवारी बांगलादेशला उपांत्यफेरीत पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.
बांगलादेशविरुद्ध सामनावीर पुरस्कार मिळालेल्या गणेशभाई मधुकरने ६९ चेंडूत ११२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
पाकिस्तान संघाने श्रीलंका संघाचा उपांत्यफेरीत पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
याच स्पर्धेत भारताने १३ जानेवारी रोजी पाकिस्तान संघाचा ७ विकेट्सने पराभव केला होता.