दक्षिण आफ्रिका संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. उभय संघातील या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने विजय मिळवला. दक्षिण आफ्रिका संघाचा एक महत्वाचा फलंदाज या सामन्यात अनुपस्थित असताना देखील त्यांच्या संघाने चांगले प्रदर्शन केले आणि ७ विकेट्स राखून विजय देखील मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या टी-२० सामन्यात दिग्गज ऍडेन मार्करम (Adien Markram) सहभागी होऊ शकला नाही. मालिकेतील या पहिल्या सामन्याच्या नेमके आधी मार्करमचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि त्याला संघात निवडले गेले नाही. दक्षिण आफ्रिका संघाचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकल्यानंतर मार्करम कोरोना पॉजिटिव्ह आल्याची माहिती दिली. याच कराणास्तव मार्करन निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध राहू शकला नाही, असेही त्याने सांगितले.
ऍडेन मार्करम दक्षिण आफ्रिकी संघासोबत २ जून रोजी भारतात दाखल झाला. त्यानंतर त्यांच्या संघातील खेळाडूंची पहिल्यांदा जेव्हा कोरोना चाचणी केली गेली, तेव्हा त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. नाणेफेक जिंकल्यानंतर आफ्रिकी कर्णधार बावुमा म्हणाला की, “ऍडेन निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध नव्हता, कारण तो कोविड १९ पॉजिटिव्ह आला आहे. त्यामुळेच स्टब्स (ट्रिस्टन स्टब्स) त्याच्या जागी फलंदाजीसाठी उतरेल.”
दरम्यान, मार्करमच्या अनुपस्थित संधी मिळालेल्या स्टब्सला फलंदाजी करण्याची वेळ आलीच नाही. कारण, दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीन विकेट्सनंतर एकही विकेट पडली नाही. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४ विकेट्सच्या नुकसानावर २११ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकी संघाने १९.१ षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर २१२ धावा केल्या.
भारतीय संघाचा सलामीवीर इशान किशनने ४८ चेंडूत संघासाठी सर्वाधिक ७६ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या ११ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता, तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकी संघासाठी मध्यक्रमतील रस्सी व्हॅन डर दुसेन आणि डेविड मिलर यांनी अनुक्रमे ७५ आणि ६४ धावांची नाबाद खेळी केली. या दोघांनीच स्वतःच्या संघाला विजय मिळवून दिला.
Rassie van der Dussen → 75* runs from 46 balls
David Miller → 64* runs from 31 ballsHow good were these two?! 🤩#INDvSA | https://t.co/EAEI2MRCT2 pic.twitter.com/BJiMOITS0o
— ICC (@ICC) June 9, 2022
इतिहास रचण्यापासून मुकला भारतीय संघ
भारतीय संघाकडे या सामन्यात एक मोठा विक्रम करण्याची संधी होती, पण पराभवानंतर हे शक्य झाले नाही. भारताने जर सामना जिंकला असता, तर हा त्यांचा टी-२० क्रिकेटमधील सलग १३वा विजय ठरला असता. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात या नवीन विक्रमाची नोंद भारताच्या नावापूढे झाली असती, पण दुर्दैवाने असे होऊ शकले नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचा एक विजय टीम इंडियाला पडला महागात! धुळीस मिळालं इतिहास रचण्याचं स्वप्न
मिलर- रस्सीपुढे भारतीय गोलंदाजांची दैना, दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्सने काबीज केला पहिला सामना
दिल्लीत तळपली इशान किशनची बॅट, तडाखेबंद फलंदाजीने केली रोहित अन् रैनाच्या विक्रमाची बरोबरी